तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत कर्मवीर विद्यालय तथा महाविद्यालय नागभीड चे घवघवीत यश

161

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9689865954

नागभीड(दि.12डिसेंबर):–विज्ञान हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगले सहजीवन जगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असते. विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा व सृजनशीलतेचा विकास होत असतो. देशाचे भविष्य घडविणारे बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे यावीत या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समीती नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 04 डिसेंबर ते 06 डिसेंबर 2023 अशी तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे संपन्न झाली.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात उत्कृष्ठ यश संपादन केले.9 ते 12 वी या गटातून विद्यालयातील 1) अर्थ संजय दुपारे 2) हर्षल तुलाराम बगडे 3) नूतन संजय चौके या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या *Electricity tester for human safety* या प्रतिकृतीची उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण करणामुळे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावित जिल्हास्तरावर निवड झाली.

तर याच विज्ञान प्रदर्शनीमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का अजय डोर्लीकर हिने जलवायू परिवर्तन या विषयावर उत्कृष्ठ मांडणी करत प्रथम क्रमांक मिळवीला.निबंध स्पर्धेत कु.प्रणिता रमेश सोनटक्के हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.तर विशेष म्हणजे माध्यमिक विभागात शिक्षक गटातून विद्यालयातील विज्ञान शिक्षिका कुमारी रजनी चिलबुले यांनी सहभाग घेऊन तयार केलेल्या शैक्षणिक साहित्यासाठी तालुकास्तरीय प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.

विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका कु. रजनी चिलबुले आणि शिक्षिका कु. प्रतिभा कायरकर यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धेत व गटात विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश विद्यालयासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या यशासाठी गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, सचिव रविंद्रजी जनवार, कार्याध्यक्ष राजन जयस्वाल संचालिका सौं. वर्षाताई जनवार ,सर्व सन्मा.संचालकवृंद,विद्यालय तथा महाविद्यालयाचे प्राचार्य .देविदास चिलबुले,पर्यवेक्षक युवराज इडपाचे सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,समाजातील नागरिक,विद्यार्थी,यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांच्या यशाबद्दल अभिनंदन करून
पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी साठी शुभेच्छा दिल्या.