बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या विधानमंडळातील बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलनाचा चवथा दिवस

161

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11डिसेंबर):-येथील खत्री महाविद्यालयांतील प्राध्यापकांना लागू झालेले माहे फेब्रुवारी 2015 पासून थांबविलेले स्थान निश्चितीचे वेतन त्वरित देण्यात यावे, अकोला महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम 1979 चार चुकीचा अर्थ काढून एमसीएसआर (8) अन्वये योग्य पद्धती न वापरता जबर शिक्षा देवून बडतर्फ करणारे आयुक्त आणि अधिकारी यांची महाराष्ट्र शासनाने नियमानुसार चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रानबोडी या गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्याकेज देऊन निर्धारित जागेवर पुनर्वसन करण्यात यावे, नागपूर मधील लक्ष्मी विद्यालय जुनी मंगळवारी येथील शिक्षक अशोक चिमणकर यांचे शिक्षणाधिकारी(माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांनी 20 वर्षाचे थकीत असलेले वेतन व्याजासह देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 7 डिसेंबर पासून बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

या आंदोलनाचा आजचा चवथा दिवस आहे.या धरणे आंदोलनाला अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी भेट देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली परंतु राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी संबंधित मंत्री महोदया कडून लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.या धरणे आंदोलनाला अमरावती विभागाचे शिक्षक आमदार एडव्होकेट किरण सरनाईक , नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघातील आमदार अभिजित वंजारी, उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे , दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे अकोला येथील माजी मंत्री दशरथ भांडे यांनी भेट देऊन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या समस्या विधानसभा आणि विधान परिषदेत मांडणार असल्याचे या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले आहे.

या धरणे आंदोलनाला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार अरविंद सोनटक्के आय आर एस, आयकर आयुक्त मुंबई, राष्ट्रीय संघटन सचिव डॉ प्रा.टी‌ .डी. कोसे, महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, राज्याचे सहसचिव नरेश मुर्ती, राज्याचे कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुजय वानखेडे, नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती कुही चे माजी सभापती संदीप खानोरकर, नागपूर जिल्ह्यातील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रा‌.प्रविण कांबळे,दिघोरीचे वंजारी गुरूजी , चंद्रपूर येथील प्रा. गजानन सपाट,प्रा.न्युत्तलवार,प्रा. मनोज निरंजने तसेच अकोला येथील सुनिल इंगळे,फुलउंबर,किशोर सोनटक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी उप प्रबंधक गोवर्धन कुंभारेइत्यादी पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त करताना शासनाच्या झूंड शाहीचा निषेध व्यक्त केला