बुद्ध विहारांची संख्या वाढत आहे मात्र ते ओस पडत आहे : जयसिंग वाघ

55

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.17डिसेंबर):-भारतात बुद्ध विहारांची संख्या वाढत आहे ही अतिशय अभिमानस्पद बाब आहे , बुद्ध विहार हे धम्माच्या प्रचार प्रसाराचे मुख्य केंद्र आहे , यातूनच बौद्ध धर्म जगभरात पोहचला , बुद्ध विहारात बौद्धिक चर्चा होवून बुद्धिवादी समाज घड़तो मात्र अलिकड बहुतांश विहारं ओस पडली आहेत असे परखड़ मत प्रसिद्ध साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

अजिंठा सोसायटी येथील बुद्ध विहारात आयोजित ‘ प्रत्येक रविवार बुद्ध विहारात ‘ या उपक्रमात आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात महाराष्ट्रात दोन विहारं बांधली गेली होती , भारतातून बौद्ध धर्म लोप पावत असतांना सुद्धा तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता . आज महाराष्ट्रातच तो मोठ्या प्रमाणात आहे व बुद्ध विहारं सुद्धा अधिक आहेत पण बहुतांश बुद्ध विहारं ओस पडली असून त्याचा गैरवापर सुद्धा होत आहे . बौद्ध जनतेने दर रविवारी बुद्ध विहारात जायला पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले असून बौद्ध जनतेने या संदेशाचे पालन करावे असे आवाहन वाघ यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेयरमन दिलीप सपकाळे होते , दिलीप तासखेडकर , प्रा. सुहास बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले , कविता सपकाळे , नूतन तासखेडकर , सुमन बैसाणे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना म्हटली , सूत्रसंचालन सुनील बीऱ्हाडे , प्रास्ताविक सुनीता बागुल , परिचय प्रवीण नंनवरे , सुनीता निकम , स्वागत रामकृष्ण सावळे तर आभार प्रतीक्षा निकम यांनी व्यक्त केले .