मोर्शी शहरातील विविध विकासकामांसाठी ८० कोटी ५३ लक्ष रुपये मंजूर !

905

🔸आ. देवेंद्र भुयार पाठपुराव्यामुळे विवीध विकास कामांना मंजुरी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.19डिसेंबर):-शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मोर्शी शहरातील रस्ते विकास करण्यासाठी ८० कोटी ५३ लाख कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, शहरातील रस्त्यांचा कामांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्ण केला आहे.

मोर्शी शहराच्या विकासाकरिता या आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून मोर्शी शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम नगर परिषदेने पूर्ण केले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मोर्शी शहरातील प्रत्येक रस्ता दर्जेदार व्हावा, केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकासात्मक कायापालट करणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.

प्रभाग क्र. ०१ मध्ये हनुमान मंदीर ते अमरावती-सिंभोरा रोड पर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे करीता ४ कोटी ३४ लक्ष २२ हजार रुपये प्रभाग क्र. ०१ मध्ये सिंभोरा अप्रोच रोड ते छापाने यांचे घरापर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे २ कोटी ९३ लक्ष ५३ हजार रुपये, ९ मध्ये अमरावती अप्रोच रोड ते सरदारजी यांचे घरापर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे करीता २ कोटी ५२ लक्ष ६ हजार रुपये, प्रभाग क्र. ७ मध्ये खडसे ते वानखडे च्या शेतापर्यंत डी.पी रोड बांधकाम करणे करीता ६ कोटी ७ लक्ष ४६ हजार रुपये, प्रभाग क्र. १० मध्ये सिंभोरा अप्रोच रोड ते करुले आणि वानखडे ते माथनकर यांच्या घरापर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे ४ कोटी १९ लक्ष ७३ हजार रु, प्राभग क्र, १ मध्ये खोलवाटपुरा पुल ते मनिमपुर अप्रोच रोड पर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे ७ कोटी ३१ लक्ष २२ हजार रु, प्रभाग क्र. ७ मध्ये राईकवार ते चांदुर बाजार रोड पर्यंत डी.पी. रोड चे बांधकाम करणे ५ कोटी ७० लक्ष ६५ हजार रु, मनोरमा कॉम्प्लेक्स ते नाला पर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे ७ कोटी ९५ लक्ष ४४ हजार रु, जयस्तंभ चौक ते आंबेडकर चौक ते अमरावती रोड पर्यंत डी.पी. रोड चे बांधकाम करणे ८ कोटी १२ लक्ष ४ हजार रु, प्रभाग क्र. ९ धुर्वे ते राजू इंगळे ते कडू यांचे घरापर्यंत डी.पी. रोडचे बांधकाम करणे १ कोटी ८९ लक्ष ९१ हजार रु, मोर्शी शहरातील या सर्व विकास कामासाठी ८० कोटी ५३ लक्ष ३७ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या सर्व विकासकामांना सुरुवात होणार आहे.

मोर्शी शहरात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष पुढाकाराने कोट्यावधी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नगरोत्थान महा अभियान अंतर्गत शहरातील उर्वरित महत्वाच्या कामांसाठी ८० कोटी ५३ लाख रुपयांच्या विकास कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली, असून या बाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट यानिमित्ताने होणार असून, ही कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असून उर्वरित विकासकामांसाठी विविध योजनांचा माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे असे म्हणत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामास मोठ्या माणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.

मोर्शी शहरातील रस्त्यांसह विविध समस्यांची परिस्थिती लक्षात घेता मोर्शी शहरातील विविध विकासकामांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत ८० कोटी ५३ लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच मोर्शी शहरातील विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे —— आमदार देवेंद्र भुयार