न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर चे सुयश-दहावीचा परीक्षेच्या निकाल 94.48 टक्के

14

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.30जुलै):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या मार्च 2020 च्या परीक्षेत न्यू राष्ट्रीय विद्यालय,चिमूर चा निकाल 94.48 टक्के लागला आहे.
शाळेतील सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे एकूण 145 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रावीण्य श्रेणीत 38 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 57, द्वितीय श्रेणी 36 विद्यार्थी व पास श्रेणीत 06 विद्यार्थी आहेत.
विद्यालयातून तथा चिमूर तालुक्यातून प्रथम क्रमांक सिद्धांत कवडूजी गेडाम या विद्यार्थ्याने 94.40 टक्के गुण मिळवले आहे. तर शाळेतून द्वितीय क्रमांक नितिकेत गजानन कारमोरे या विद्यार्थ्यांने 92.20 टक्के मिळवले आहे.
तसेच तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा मनोज मडावी व कुमारी श्रेया सोनुजी बोनगिरवार या विद्यार्थीनींनी
मिळवलेला आहे. त्यांनी 89.60 टक्के गुण मिळवले आहे.
शाळेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक किशोर खोब्रागडे, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेली आहे.