राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मधील हलगर्जीपणे खोदकामामुळे शेतकऱ्याचे सहा वर्षा पासुन सिंचन शेतपिकांचे नुकसान

126

🔸शेती पुस्स्कार प्राप्त अशोक वानखेडे ची शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.२२ डिसेंबर):-नागपूर – तुळजापूर महामार्ग क्र ३६१ लेवा – वारंगा जानार्‍या या रस्त्याचे काम सन २०१८ पासुन प्रत्यक्ष सुरु केले असतांना सुकळी (ज) येथाल राष्ट्रीय किसान प्रगत पुरस्कार प्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांची मालकी शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग रस्ता कामात मधोमध विभागली गेली असतांना या जमीनीत नेहमी करिता उस उत्पादन घेत होते.

या शेताला सिंचन व्यवस्था म्हणून स्वत: च्या विहिरीतील पाईप लाईन केलेली होती हि पाईप लाईन पुर्वी शासनाकडुन परवानगी मिळऊन केली होती असे असतांना रस्ता काम करतांना हलगर्जीपणा करून त्यावेळच्या सदभाव या कंपनी कंत्राटदार यांनी पाईप लाईन तोडताड करुन शेती सिंचन सुविधा पुर्न : नेस्तानाबुत केली त्या मध्ये शेती पिकांचे सर्वेनंबर २२६ व २२७ मधील प्रचंड नुकसान झाले.

शेतकरी अशोक वानखेडे यांनी कंत्राटदार यांच्या चाललेल्या मनमानी विरोधात २८ जानेवारी २०१९ मध्ये येथील तत्कालीन उपविभागिय महसुल अधिकारी स्वप्नील कापडनिस यांच्या कडे या बाबत रितसर तक्रार दाखल केली होती तेव्हा संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार यांनी पुर्ववत पाईप लाईन त्याच पद्धतीत पूर्ववत ठेवून नव्याने दुरुस्ती करून देतो असे हमी पत्र देऊन सुद्धा आतापर्यंत वेळकाढू पणा केला.

तेव्हापासुन आज पावेतो सलग ६ वर्ष पूर्ण होत असतांना अद्यापही मोडतोड झालेली पाईप लाईन आजही त्याच अवस्थेत असल्याने उस प्रति वर्षी एकरी ७० टन होऊन उसाचे होत असतांना अजता गायत ११ लाख २५ हजार रुपयाचे ओलीत शेती उस पिकांचे नुकसान झाले आहे याची चौकशी होणे तेवढेच महत्वाचे ठरते तेव्हा या मध्ये शेत सर्वे नंबर २२६ व २२७ मधील पर्ववत पाईप लाईन करून देऊन आता पर्यंत प्रति वर्षी शेती पिक उत्पादन ७० टन प्रमाणे १०० – ११० टन उसाचे उत्पादन होत होते त्या पोटी मिळणारे ११ लाख २५ हजार रुपये नुकसान तत्काळ देण्यात यावेत , या सर्व खचीकरणाला संबधीत कंत्राटदार जबाबदार असल्याचे हदबल असलेले शेतकरी अशोक वानखेडे यांनी पुन्हा शासनाकडे २१ डिसेंबर रोजी दिलेल्या उपविभागिय अधिकारी डॉ.व्यकंट राठोड यांच्या कडे दिलेल्या नुकसानी भरपाई मागणी मिळणे बाबत च्या निवेदनातून म्हटले आहे.

-चौकट –
राज्य व केंन्द्र सरकार शेती प्रगत शेतकऱ्यांना शासना कडुन प्रगतशील शेतकरी म्हणून गौरविन्यात येतो त्यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान हि मोठ्या थाटात केल्या जाते आणि याच सन्मीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्का च्या मोबदल्या पासुन दुर ठेवल्या जाते त्यातच शासन स्तरातील रस्ते विकास कामात भूसंपादित जमीनी करित असतांना त्यांच्यावर घोरपणे अन्याय केल्या जातो मगतर हे वास्तव पणे खरी तर थट्टा उडविन्यांचे षडयंत्र होय.

असे समोर स्पष्टणे असतांना शासन स्तरावर सलग सहा वर्षापासुन दिलेल्या निवेदनाची दखल होत नाही हि तर निर्दयी भुमिका सरकारची ठरत आहे असे म्हणत आपणास शासनाकडिल राष्ट्रीय प्रगत किसान मिळालेला पुरस्कार आपण शासनास परत करणार आहोत – अशोक वानखेडे
(शेती मित्र पुरस्कार प्राप्त)