गेवराई नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू

162

🔸मुख्याधिकारी विशाल भोसले यांची कार्यालय अनुपस्थिती

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22डिसेंबर):-नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणारे सोमनाथ लक्ष्मण राऊत वय वर्ष ५० हे गेवराई नगर परिषद स्वछता विभाग कर्मचारी असतानाही कुठल्या तरी कारणावरून राजकीय दबावाखाली तात्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर व्यक्तीस ०६/ ०१/२०२० रोजी निलंबित केले होते.

या निलंबनाला कंटाळून सदर व्यक्ती हा कर्जबाजारी झाला आणि अधिक व्यसनाधीन झाला या कारणाने सदर व्यक्तीचा दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी मृत्यू झाला सदर व्यक्तीचे नातेवाईक हे राजकीय लोकांवर ताशेरे उडत आहे. मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असताना सदर व्यक्तीला मृत्यूच्या दारेवर उभे असताना रुजू होण्याचे पत्र देण्यात आले. यावेळी नातेवाईक आक्रोश करत होते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैन्यात करण्यात आला होता