अपंग व्यक्तीला डिझेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

1103

🔸तब्बल २० जणांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.23डिसेंबर):-जुन्या वादाच्या व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गावातील जवळपास २० ते २१ लोकांनी मिळून मला जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद चकलांबा पोलीस स्टेशन ठाण्यात अपंग अर्जुन लक्ष्मण नागरे यांनी दिल्याने फिर्यादीवरून तब्बल २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी मी शेतात दगड व काटे विचित्र असताना जवळपास २० ते २१ लोकांचा जनसमुदाय आला तेवढ्यात गोवर्धन रावसाहेब गरकळ यांनी डिझेलची बाटली काढली व भिवसेन त्रिबक गरकळ यांनी काड्याची पेटी काढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच अरुण भिवसेन गरकळ, नंदुबाई भिवसेन गरकळ यांनी माझ्या डोळ्यात चटणी टाकण्याचा प्रयत्न केला, तसे शेतामधून आपला मुलगा व मुलगी पळत आले तोपर्यंत बाकी तेथील लोकांनी मिळून मला मारहाण केली यात शंकर त्र्यंबक गरकळ, नारायण दिनकर गरकळ, अंबादास महादेव गरकळ, अरूण दिनकर गरकळ यांच्यासह २१ लोकांनी मारहाण करून यांनी गट क्रमांक २१८ मधील शेतात पेरणी केलेली ज्वारी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मोडून टाकली.

यावेळी माझी मुलगी व मुलगा हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, त्यांना देखील लोकांनी मारहाण केली अशा प्रकारच्या अर्जुन नागरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा पोलिसात २१ लोकाविरोधात अपंग अधिनियम २०१६ कायद्याप्रमाणे तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणी व भादवी ८६० प्रमाणे ३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,२८५,४२७,५०४,५०६ या कलमा प्रमाणे ९२ अंपग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास इंगळे साहेब हे करीत आहे