आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,आता नाही तर कधीच नाही-मनोज जरांगे पाटील

157

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23डिसेंबर):-मराठा समाजाला ओबीसीतूनच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी एक सुत भर ही मागे सरकणार नाही.आता सध्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यावर आली असून,आता नाही तर कधीच नाही त्यामुळे तुम्ही बांधवांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे दि. 22 डिसेंबर रोजी गंगाखेड येथे जाहीर सभेत बोलताना याप्रसंगी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

गंगाखेड पालम सकल मराठा बांधव यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रात्री साडेसात वाजता सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तब्बल पन्नास जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. गंगाखेड परिसरात नवीन मार्केट यार्डात हजारो मराठा बांधव यांनी उपस्थिती लावली होती. जाहीर सभेच्या निमित्ताने परळी नाका ते सभेच्या ठिकाणापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी खिचडी पाणी पोस्ट नागरिकांसाठी लावण्यात आले होते. याप्रसंगी मराठा बांधवांनी”एक मराठा, एक लाख मराठा”जय जिजाऊ जय शिवराय “या घोषणेने गंगाखेड शहर घोषणामुळे दनानुन सोडले होते.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारला आम्ही 24 डिसेंबर ही तारीख दिली होती ती आता दोन दिवसावर आली असून पुढे काय करायचे मी आत्ता सांगणार नाही,पण आपण शिवाजी महाराजांचे मावळे असल्यामुळे आपण शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी कावा आपल्याला माहित आहे.याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत माझी बैठक झाली. या अगोदर त्यांनी 40 चाळीस दिवसाचा वेळ मागितला होता तो आपण दिला, नंतर दोन महिन्याचा वेळ दिला, आरक्षण कायदा द्यायचे ठरले होते. त्यामुळेआता 24 डिसेंबर ही वेळ दिली आहे 24 डिसेंबरला दोन दिवस आणखी बाकी आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी काव्याचा उल्लेख करत आता सरकारला काही सांगायचे नाही.परंतु या सरकारने आमच्या बांधवांनी येऊ नये म्हणून काही बांधवांना पोलिसांनी नोट्स दिल्या आहेत. आम्ही मुंबईला येणार आहात परंतु आता तारीख सांगता येणार नाही.आम्ही सर्व मुंबईला येणार आम्ही येताना आमच्या पदरच्या भाकरी बांधून त्या ठिकाणी आलो तर तुम्ही आमची फक्त एकच सोय करा असा इशारा अप्रत्यक्षपणे सरकारला दिला आहे.मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार की नाही हे आता सांगता येणार नाही.सर्व दिशा 24 तारख्येच्या नंतर सांगणार असल्याचे यावेळी सभेला बोलताना संबोधित केले.या सभेसाठी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती असतानाच पोलीस अधिक्षका रागवसुधा आर मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा खाली पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.