पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धरणगावात पत्रकार संघटनेतर्फे सत्कार..

97

 

🔸पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा; ॲड. व्ही एस भोलाणे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.23डिसेंबर):-येथील पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व तपासातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्याचा उद्देशाने धरणगाव पत्रकार संघटनेतर्फे पोलिस स्थानकाच्या प्रांगणात सत्कारमूर्ती पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, सहा.पो.उपनिरीक्षक करीम सय्यद, हवालदार संजय सूर्यवंशी, हवालदार मिलिंद सोनार यांना जेष्ठ पत्रकार ॲड. व्ही एस भोलाणे, कडू महाजन, डी एस पाटील, राजेंद्र रडे, भगीरथ माळी, बी आर महाजन, बाळासाहेब जाधव, धर्मराज मोरे यासह पत्रकारांच्या उपस्थितीत शाल, पुस्तकं ( ग्रंथ ), पुष्पगुच्छ भेट देवून आणि मिठाई भरवून सत्कार सन्मानाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद रोकडे यांनी केले.

सत्कार सन्मानप्रसंगी ॲड. व्ही एस भोलाणे यांनी मनोगतात सांगितले की, पोलिस बांधवांनी गणेशोत्सव ११ दिवस, नवरात्री, विजयादशमी चे १० दिवस, तब्बल १५ दिवसाचा वहनोत्सव, ईद, रमजान, कुस्ती दंगल, सभा, मेळावा, मोर्चा असे विविध कार्यक्रम दरम्यानचा काळात धरणगाव शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. त्याचप्रमाणे गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा, अर्थातच प्रणाली राबविणे, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता सेवा बजावत राहणे. त्याचप्रमाणे आपण सर्व समाज सण, उत्सव धुमधडाक्यात साजरा करतो. पण, पोलिस बांधव हा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निरंतर कटिबद्ध असतो.

नुकत्याच पार पडलेल्या सण-उत्सवाच्या काळात शहरात एकही दखलपात्र गुन्हा दाखल झाला नाही, ही अभिमानास्पद कामगिरी आहे यात धरणगाव पो.स्टे. कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. तसेच, मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांचा देखील गौरवोद्गार करण्यात आला. म्हणून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामाप्रती उत्साह कायम राहून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मानपूर्वक गौरव व्हावा, आणि दैनंदिन कामकाजामध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता तयार होवून पोलिस प्रशासनाने लोकाभिमुख व्हावे. असेही ॲड.भोलाणे यांनी गौरवोद्गार काढले.

तद्नंतर धरणगाव पोस्टे चे पो.उ.नि. संतोष पवार यांनी सत्कार सन्मान प्रसंगी मनोगतात सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारिता हे समाजसेवेचे व्रत असून अतिशय प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याची संधी पत्रकारांना मिळत असते. मी पदभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत धरणगावातील पत्रकारांची निष्पक्ष पत्रकारिता पहावयास मिळाली असेही श्री. पवार यांनी सांगितले. यानंतर सहा.पोउनि. सय्यद यांनी आजचा सत्कार माझा एकट्याचा नसून सर्व सहकाऱ्यांचा आहे. असे मी समजतो. यानंतर हवालदार मिलिंद सोनार यांनी मनोगतात सांगितले की, येथील पत्रकार बांधव हे निरंतर दीन दुबळ्या, उपेक्षित, दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्यासाठी कठीबद्ध असतात. त्याचप्रमाणे धरणगावात तरी निष्पक्षपणे पत्रकारिता केली जाते असा आजपर्यंतचा मला आलेला अनुभव आहे. आजचा सन्मान हा अधिक जबाबदारी वाढविण्याचा असून पुढील काळात धरणगाव पोलिस प्रशासन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असल्याचे मत हवालदार सोनार यांनी सांगितले.

तद्नंतर हवालदार संजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांकडून पोलीसांप्रती आदर, स्नेहभाव व्यक्त करून केलेल्या सन्मानबद्दल पत्रकारांचे मनस्वी आभार व्यक्त केले. याप्रसंगी पोहेकॉ. दिपक पाटील, राजेंद्र पाटील, चंदू गोसावी आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजितेसाठी पत्रकार ॲड. हर्षल चौहाण, निलेश पवार, सुधाकर मोरे, राजू बाविस्कर, पी डी पाटील, विकास पाटील, सतिष शिंदे, धनराज पाटील, राजेंद्र वाघ आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन आर डी महाजन यांनी केले.