विहिरीत पडून पट्टेदार वाघाचा मृत्यु

427

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9689865954

नागभीड(दि.24डिसेंबर):- ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी (बा).वनपरिक्षेत्रातील गोविंदपुर बिटात आज सकाळी गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ शिकारीच्या शोधात पडून मृत्यू पावला.
तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांनी वनविभाग चमु घेऊन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी विहिरीत पडलेल्या वाघाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.सदर पट्टेदार वाघ हा नर असुन अंदाजे वय अडीच वर्षाचे आहे.

यावेळी ब्रम्हपुरी वनविभाग चे प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक एस.डी.हजारे, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविंदपुर क्षेत्रसहाय्यक आर.एस.गायकवाड, तळोधी चे क्षेत्र सहायक मने,नेरीचे क्षेत्रसहाय्यक रासेकर, वनरक्षक श्रीरामे,बंडू धोतरे एन.टि.सी.ए.,मानद वन्य जीवरक्षक विवेक करंबेळकर, पंकज माकोडे एन.जीओ.यश कायरकर, पशुवैद्यकीय डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ.ममता वानखेडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले.यावेळी तळोधी बा.पोलीस स्टेशन चे कर्मचारी वर्ग बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित होते.विहिरीत पडलेल्या वाघाला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती.सावरगांव येथील रोपवाटीका मध्ये मुत्यु पडलेल्या वाघाचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.