डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कारासाठी गोविंद यादव यांची निवड

56

🔸३० डिसेंबर रोजी मुंबईत होणार सन्मान

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26डिसेंबर):-समता साहित्य अकादमीच्या वतीने विविध क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम समता राष्ट्रीय पुरस्कार गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गोविंद यादव यांना घोषीत झाला आहे. येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती अकादमीच्या वतीने देण्यात आली आहे.

समता साहित्य अकादमी ही संस्था कला, साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्यांचा गौरव २००८ पासून करत असते. या संस्थेची वार्षिक अधिवेशने यापूर्वी देशभरातील प्रमुख शहरांसह परदेशातील कौलांलपूर ( मलेशिया), कोलंबो ( श्रीलंका), थींपू ( भुतान), बॅंकॉक ( थायलंड ), काठमांडू ( नेपाळ ) आदि ठिकाणी संपन्न झाली असून यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आलेले आहे.

यावर्षी सामााजिक कार्याबरोबरच पत्रकिरितेतील ऊल्लेखनीय कार्याबद्दल गोविंद यादव यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. गोविंद यादव हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, पत्रकारिता व सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत आहेत. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाची पत्रकारिता व जनसंवाद विषयातील पीएचडी पात्रता ( पेट ) परिक्षा ऊत्तीर्ण झालेले आहेत.

समता साहित्य अकादमी संस्थेचे वार्षिक अधिवेश या वर्षी मुंबईतल्या डॉ. शिरोळकर स्मारक मंदिर सभागृहात ३० डिसेंबर रोजी संपन्न होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एस. तांडेकर, युवक अध्यक्ष रोहित तांडेकर यांनी दिली आहे. गोविंद यादव यांचेसह पत्रकार रमजान बिलुभाई मन्सूरी ( गुजरात), पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे, पत्रकार निकेष शार्दुल ( मुंबई ) आदिंचाही या अधिवेशनात गौरव केला जाईल. जेष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधिर सावंत, सिने अभिनेते अर्जुन यादव, शासनाचे उपसचिव तथा एमपीएससीचे मार्गदर्शक तथा महात्मा जोतीबा फुले यांचे वंशज नंदकुमार राऊत, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, बालकल्याण विभाग मुंबईचे न्या. डॉ. संदेश शिरसाठ आदिंसह ईतर मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे. या गौरवाबद्दल गोविंद यादव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.