कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या-राजेंद्र मोहितकर

39

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28डिसेंबर):-कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावे महाराष्ट्र सरकारने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. त्याचप्रमाणे भारत सरकारदेखील स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करित आहे. स्वच्छतेचा मुलमंञ देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भारमातेच्या महान सुपुञांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देवून त्यांचा यथोचित सन्मान करावा अशी मागणी जीवन प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी केली.

ते कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या ६६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर चिमूर येथे हनुमान मंदिरात तळ्याच्या पाळीवर बोलत होते.यापूर्वी महाराष्ट्र सरकारने नागपूर व अमरावती विद्यापीठांना या दोन्ही महान संतांची नावे देवून मानाचा मुजरा केलेला आहे.समाजाला सेवेची शिकवण देणारे हे महानपुरूष आहेत.कर्मयोगी संत गाडगेबाबांनी स्वतः हाती खराटा घेवून संपूर्ण गाव स्वच्छ केल्याशिवाय कीर्तन केले नाही.असा थोर महामानव जगातही मिळणार नाही.लोकांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या पण स्वतः एकही दिवस मुक्काम केला नाही.लोकांनी दिलेले नवीन कपडे त्यांनी समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना दिले.स्वत: माञ त्यांनी अंगावर जन्मभर चिंध्या घेतल्या.त्यांच्या चितेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अग्नी दिला,हा योगायोग आहे.

संताचे विचार समाजात जागृत राहावे ,नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची जयंती- पुण्यतिथी साजरी केली जाते.आज समाजाला संताच्या विचाराची गरज आहे.कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रचंड सेवेचे कार्य लक्षात घेता त्यांना भारत सरकारने भारतरत्न सन्मान द्यावा अशी आग्रही मागणी राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी श्री संत वॆराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती चिमूरच्यावतीने आयोजित पुण्यतिथी महोत्सवात केलेली आहे. या मागणीला अनेक लोकांचा गेल्या वीस वर्षांपासून पाठिंबा आहे,परंतू भारत सरकारने अजुनही निर्णय घेतलेला नाही.