वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाला

290

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.1जानेवारी):-शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानासाठी साधनव्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. श्रीमती भारती पाटील या “विवेकवादी शिक्षणाचे काय झाले” या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला हे भूषविणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे विश्वस्त व सदस्य मा. श्री अरुण पाटिल (काका) हे उपस्थित राहणार आहेत.
सदर व्याखानासाठी प्राध्यापक, पालक, विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी कलारंजन सभागृह, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे उपस्थित राहून व्याखानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.