उत्पन्न वाढीसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करणे आवश्यक- अजित जैन

302

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगांव(दि.1जानेवारी):- “जास्त पाणि म्हणजे जास्त उत्पन्न” ही पारंपारीक समज दूर सारून विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देवुन कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवुन देणारी शेती शक्य असल्याचे मत जैन इरिकेशन सिस्टीमचे सह व्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांनी व्यक्त केले.

“हायटेक शेतीचा नवा हंकार” या ध्येयाने जळगाव येथील जैन हिल्स वर कृषि महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात विदर्भातील डिजीटल क्षेत्रातील पत्रकारांना सहभागी करून घेतले होते. त्यावेळी अजीत जैन पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.

संशोधन व विकास हे ध्येय उराशी बाळगुन जैन हिल्सवर शेतीविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. सामान्य शेतकऱ्यांना ज्ञान व माहिती पुरविणे हा उद्देश असल्यामुळे आर्थीक उलाढाल किती होते हा विषय दुय्यम ठरतो. मात्र आजस्थितीला जळगांव प्रकल्पात सुमारे दोन ते अडीच हजार व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देणे सुरू आहे असे जैन यांनी सांगीतले.

विदर्भातील शेतीबाबत अजित जैन यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, विदर्भातील सर्व जिल्हात नैसर्गीक पाणी पुरेशे आहे. मात्र तेथील शेतकरी पारंपारिक शेतीच्या विचारातुन बाहेर निघतांना दिसत नाहीत. नागपुरची संत्रा शेती सध्या कमी होताना दिसत आहे. संत्राची परदेशी निर्यात व स्थानिक पातळीवर प्रक्रिया प्रकल्प उभे का राहत नाहीत? या विषयावर चिंतनशिल अभ्यास करणे आवश्यक आहे.

या करीता जैन इरिकेशन समुहाने हात पुढे केले आहे. आता विदर्भातील शेतकरी कसा प्रतिसाद देतो यावर पुढील वाटचाल सुरू राहील. परंपरागत शेती पद्धत व पिक पद्धत बदलावी लागेल, हवामान व तापमाण लक्षात घेऊन पिकांची फेरपालट करावी लागेल. नैसर्गीक व सेंद्रीय शेतीकडे अधिकाधिक लक्ष देवुन रासायनिक खते व औषधांचा कमीत कमी व अत्यावश्यक तेवढाच वापर कसा होईल हे पाहिले पाहिजे. असेही ते म्हणाले.

विदर्भातील पत्रकार अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व जेष्ठ पत्रकार आंनद आंबेकर व डिजीटल मिडीया सल्लागार तथा अभ्यासक देवनाथ गंडाटे यांनी केले. जैन इरिकेशन प्रकल्पाचे कामकाज व उपक्रम समजवुन सांगण्यासाठी जैन इरिकेशनचे मिडीया विभाग उपाध्यक्ष अनिल जोशी, किशोर कुलकर्णी, देवेद्र पाटील, डॉ. के.व्ही.पाटील, डॉ. बालकृष्णन सर, विजयसिंग पाटील यांनी विशेष सहकार्य केले.


या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रतिक साबळे, दिलीप घोरमारे, अनुप पठाणे, विलास गोंदोळे, आशिष धापुडकर, सचिन धानकुटे, संजय धोंगडे, गणेश शेंडे,राजेंद्र कवडूजी निमसटकर, शेख दिलदार शेख सिकंदर, प्रशांत कृष्णाजी चंदनखेडे, सचिन मेश्राम, अनंता सिताराम गोवर्धन, सुलेमान बेग, किशोर कारंजेकर, गोपाल कडुकर, प्रफुल्ल उरकुडे, राजेंद्र उट्टलवार, सनी भोंगाडे, सुरेश डांगे, शेखर गजभिये, नत्थयू रामेलवार, कवीश्वर खडसे, संदीप गौरखेडे, अनिलसिंग चव्हाण, अनुप भोपळे, आणि रुपेश वणवे, राजू डोंगरे, दिनेश लायचा यांचा समावेश होता.

या दौऱ्यात पत्रकारांना जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. येथील जैन हिल्सच्या शेती संशोधन प्रात्याक्षिक केंद्राला भेट दिली. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. यात भविष्यातील शेती (फ्युचर फार्मिंग), माती रहित मिडीयामध्ये शेती, हार्होपोनिक, एरोपोनिक फार्मिंग, टिश्यूकल्चर तंत्रज्ञान, जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक बायोटेक लॅब सह अन्य प्रकल्प समजून घेण्यात आले.