उमरखेड येथे भिमा कोरेगांव ‘शौर्य दिनानिमित्त’ विजयस्तंभाची भव्य अभिवादन रॅली

164

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा तालुका प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.१ जानेवारी):-भिमा कोरेगांव शौर्यदिनानिमित्त उमरखेड नगरीमध्ये प्रथमच विजयस्तंभाच्या भव्य प्रतिकृतीचे आगमन झाले व त्याच बरोबर अभिवादन रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

भारताच्या इतिहासात भिमा कोरेगांवच्या ०१ जानेवारी १८१८ या युध्दाचे अनन्यसाधारण महत्व आहे. पेशवाईच्या काळात दलीतांना मिळणारी हिनवागणूक, जुलूम या साऱ्यांचा झालेला अतिरेक आणि या सर्व समाजव्यवस्थेविरूध्द आत्मसन्मानाकरीता तत्कालीन शूरविर महार सैनिकांनी पेशवांच्या विरूध्द लढून दैदिप्यमान विजय मिळविला.

हा मानवतेचा ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर तत्कालीन ब्रिटीश सरकारने भिमा नदीच्या काठी शूरविर नागवंशी महार सैनिकांच्या सन्मानानार्थ भव्य विजयस्तंभ उभारून त्या सर्व सैनिकांचा स्तंभावर पुष्पवर्षाव करून सन्मान करण्यात आला.

चौकट :- “शूरविर नागवंशी महार सैनिकांचा हा गौरवशाली इतिहास समकालीन पिढीला आणि येणाऱ्या पिढीला दिपस्तंभासारखा प्रेरणा देत राहावा” – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड)

दरवर्षी देशभरातून आणि विदेशातून तमाम भिमसैनिक तथा अठरापगड जातीतील बहुजन बांधव लाखोंच्या संख्येने भिमा कोरेगांव येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात.

क्रांतीकारी इतिहासाच्या दैदिप्यमान यशोगाथेचे स्मरण सर्वसामान्य जनतेला व्हावे या हेतूने प्रथमच उमरखेड नगरीत किशोरदादा भवरे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र) यांच्या अथक प्रयत्नातून भिमा कोरेगांव विजयस्तंभाची भव्य प्रतिकृती तयार केलेली.या रॅली ची सुरुवात सकाळी ९:३० वाजता करण्यात आली होती.

सदर ही भव्य अभिवादन रॅली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून माहेश्वरी चौक ते बस स्टँड पासून पुसद येथील बिरस मुंडा चौक येथून तहसील कार्यालय समोरून बोरबन येथील सुमेधबोधी बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक यांचा सत्कार करण्यात आला व अल्पउपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी भिम टायगर शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते, साहेबराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते, श्याम धुळे (जिल्हा कार्यालय भिम टायगर सेना), गोपाल मुनेश्वर (सामाजिक कार्यकर्ते), शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), सुनील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), प्रा. अनिल काळबांडे, आत्माराम हापसे, धम्मपाल काळबांडे,संतोष निथळे तसेच महार बटालियनचे मेजर असे अनेक समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने विजयस्तंभास अभिवादन करण्याकरिता उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, उमरखेड सर्व बौध्द विहार समिती, पदाधिकारी, उमरखेड तथा सर्व बहुजन समाज बांधव, उमरखेड यांनी केले होते तर सौजन्य म्हणून किशोरदादा भवरे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा दलितमित्र, उमरखेड) यांनी केले.