शाखा अभियंता विरेंद्र क्षीरसागर यांचा हृदयस्पर्शी सत्कार सेवानिवृत्त समारंभ संपन्न

88

✒️बाळासाहेब ढोले(पुसद,तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.1जानेवारी):-जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग शाखा अभियंता विरेंद्र शिरसागर यांना दिनांक, 29 डिसेंबर 2023 रोजी हॉटेल अतिथी येथील सभागृहात सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.

या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष, अभियंता प्रमोद उपाध्ये,प्रमुख अतिथी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, सत्कारमूर्ती वीरेंद्र शिरसागर,विनाताई क्षीरसागर,कन्या वैष्णवी,अभियंता जोशी,उपअभियंता सतीश नांदगावकर,मनोज रंजन,श्री गादेकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम अभियंता विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सत्कारमूर्ती वीरेंद्र क्षीरसागर, विनाताई क्षीरसागर यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शशिकांत बोजेवार, विनोद चव्हाण, महेंद्र ठाकरे,सुरज बिलवाल, संजय कुकडे इत्यादींनी साईबाबा व पंढरीचा पांडुरंग यांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

अनेक विकासात्मक कामे करून अभियंता म्हणून जबाबदारी पार पडली माझ्या जीवनात अनेक प्रसंगात त्यांनी मोलाची साथ दिली अभियंता शिरसागर आई-वडिलांनंतर हेच माझे आदर्श असल्याचे मनोगत अर्बन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश राठोड यांनी व्यक्त केले.

उपअभियंता सतीश नांदगावकर म्हणाले की माझी पहिल्यांदा पोस्टिंग झाली तेव्हा मी वीरेंद्र क्षीरसागर साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला कोणत्या प्रकारची काळजी करू नका, असे म्हणत वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केले त्यामुळेच मी आज चांगल्या प्रकारचं काम करू शकत असल्याचे मत यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

“सोबत काम करत असताना अतिशयआनंदाची बाब त्यांच्याकडून मिळाली त्यांच्या कामाची शैली अतिशय निपुण होती सर्वांना सोबत घेऊन कामकरण्याची युक्ती त्यांच्याकडून शिकले पाहिजे या निरोप समारंभाला एवढा मोठा कर्मचारी व चाहता वर्ग उपस्थित राहिला हीच त्यांच्या कामाची पावती आहे, त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना भावी निरोगी जीवनाला शुभेच्छा देतो,
असे प्रतिपादन गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी केले.

“शेवटी सत्काराला उत्तर देताना वीरेंद्र क्षीरसागर म्हणाले की मी सर्व कर्मचारी यांच्या सोबत काम केले काम करीत असताना अनेक समस्या व अनेक संकट उभी राहिली परंतु सर्वांच्या सहकार्या मुळेच मी तीस वर्षे सेवेचे पूर्ण केले सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात वेगळाच आनंद असतो तसेच माझी पत्नी विना सिरसागर हिचा सुद्धा
तेवढाच मोलाचा वाटा आहे.

असेही सत्कारमूर्ती शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बोजेवार यांनी केले या कार्यक्रमाला ग्रामसेवक टी.पी. राठोड, संजय हिंगाडे, सरपंच आशिष काळबांडे, चंद्रकांत हराळ, पत्रकार रिपब्लिकन वार्ता चे विदर्भ उपसंपादक,दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पुसद तालुका प्रतिनिधी राजेश ढोले, विदर्भ केसरीचे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.