दशरथ महाजन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित !…

58

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.1जानेवारी):- धरणगाव शहरातील श्री सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ धरणगाव मोठा माळीवाडा माळी समाजाचे माजी सचिव दशरथ झेंडू महाजन यांना पाळधी येथे ३० डिसेंबर, २०२३ शनिवार रोजी पद्मसिद्धी लॉन्स अँड मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या शुभहस्ते “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चनाताई माळी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खान्देश माळी महासंघाचे संतोष इंगळे, संध्याताई माळी, मुरलीधर महाजन, वसंत महाजन उपस्थित होते. माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशन परिवार जळगाव यांच्या वतीने दरवर्षी माळी समाजामध्ये उत्कृष्ट सामाजिक – शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. यावर्षी धरणगाव तालुक्यातून दशरथ झेंडू महाजन हे गेल्या अनेक वर्षापासून समाजाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केलेले होते. त्यांच्या कारकीर्दीत धरणगाव मध्ये सामूहिक विवाह सोहळा च्या अंतर्गत २००५ ते २००९ या पाच वर्षात २५६ लग्न लावले.

यानंतर राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा धरणी चौकात बसविलेला पूर्णाकृती स्मारक, माळी समाज पंचमंडळाची दोन मजली प्रशस्त इमारत अशा अनेक कामांमध्ये दशरथ महाजन यांचा व संपूर्ण माळी समाज पंच मंडळाचा खारीचा वाटा आहे. या त्यांच्या सामाजिक कारकिर्दीबद्दल त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मला माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशन परिवार जळगाव यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. माझ्या वर विश्वास ठेवणारे व मला सतत मार्गदर्शन करणारे माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व माळी समाजातील जेष्ठ – श्रेष्ठ मान्यवर यांच्या मुळेच व सर्वांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला. पुरस्काराने ऊर्जा मिळते व सामाजिक काम करण्याची ऊर्जा घेऊन मी नेहमीच समाजसेवा करीत राहील असे प्रतिपादन महाजन यांनी केले. दशरथ महाजन यांचे धरणगाव शहर वासियांकडून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.