इंधन भरण्यासाठी लोकांची पंपावर उसळली गर्दी

518

🔸केंद्र सरकारच्या कायद्यांनी जनताही संतापली

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.1जानेवारी):-नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली असताना. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांनी आंदोलन केले. केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची चित्रे दिसून येत आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांनी आंदोलन केले.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे चालकांकडून काम बंद पुकारण्यात आला आहे. या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल , डिझेलसह, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प होण्याचे प्रमाण वाढले असून, संप जास्त लांबल्यास जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल.

इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वत्र पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. आता बेमुदत संप केव्हा पर्यंत राहील या भीतीने जनतेची इंधन भरण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.