रानकवी जगदीप वनशिव यांना साहित्यिक गौरव पुरस्कार जाहीर

92

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.2जानेवारी):– डॉ बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अनेक क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुणे येथील सुप्रसिध्द निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांना या वर्षीचा राज्यस्तरीय साहित्यिक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मा.नरेद्र पवार उपाध्यक्षा माला मेश्राम सचिव अनिल सावंत प्रमुख सल्लागार डॉ विनोदजी जाधव यांनी दिली रानकवी जगदीप वनशिव गेली 35 वर्ष साहित्य सेवा करत असून महामहीम ज्येष्ठ कविवर्य सुरेश भट गीतकार जगदीश खेबुडकर पद्मश्री नारायण सुर्वे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी रानकवी ही उपाधी बहाल केली असून साहित्य क्षेत्रातील एकमेव अवलिया सर्व कविता चारोळ्या पाठांतर असणारे शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून ते नेहमी प्रगट होत असतात कोणत्याही कार्यक्रमाचे नेहमी सूत्रसंचालन करत असतात.

अनेक साप्ताहिक मासिक दैनिक दिवाळी अंकातून लेख कविता प्रकाशित होत राहतात .चित्रपट लेखन कथा पटकथा संवाद गीतकार म्हणून ओळखले जाते वेदनेला अंत नाही कवितेचा गाव रानपाखरू प्रेयसीच्या गावात उलघाल अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अनेक पुरस्कार प्राप्त असे ते दिग्गज साहित्यिक आहेत.महाराष्ट्र राज्यभरात अनेक कविसंमेलन साहित्य संमेलन विविध विषयांवरच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला आहे आगामी चित्रपट काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर असून कवितेसाठी कुठेही केव्हाही असे जगण्याचे ब्रीद वाक्य तयार केलेले आहे ज्ञानाई फाऊंडेशन पुणे आपुलकी फाऊंडेशन इंदापूर काव्य शिल्प संस्था पुणे साहित्य सम्राट संस्था साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे रूग्ण हक्क परिषद संवेदना कलामंच जिव्हाळा संस्था ग्रामीण साहित्य कलाप्रेमी संस्था संत चोखामेळा अध्यापन संशोधन केंद्र आळंदी अशा अनेक संस्थांनी व ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक पत्रकार मित्र वाचकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.