“हिट अँड रन कायदा” वाहन चालकावर अन्याय करणारा-बबलू कुरेशी

169

🔸हिट अँड रन कायदा रद्द करा;चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेची मागणी

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3जानेवारी):- केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन ” कायदा पारित केला आहे, या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट 10 वर्षे कारावास आणि 7 लक्ष रुपयाचे दंड अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे, त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून चालकावर प्राणघातक हल्ले केले जातात व जिवे मारण्याचा प्रयत्नही होतो, त्यामुळे आत्मसंरक्षनासाठी वाहन चालक घटनास्थळावरून निघून जातात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षा करणे हेही अमानवीय आहे, त्यामुळे  ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून हा कायदा चालकावर अन्याय करणारा आहे असे मत चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष शोएब उर्फ बबलू कुरेशी यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन ” कायदा पारित केला आहे, या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट 10 वर्षे कारावास आणि 7 लक्ष रुपयाचे दंड अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटना चिमुरात दिनांक 2 जानेवारी पासून आंदोलन सुरू आहे,आंदोलनाबाबत पुरोगामी न्युज नेटवर्कचे प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना बबलू कुरेशी पुढे म्हणाले,हा अन्यायकारक कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्याल्यावर धडक मोर्चा नेण्यात आला.

दरम्यान 3 ते 4 तास रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाचे माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने केंद्रीय गृहमंत्र्याकडे “हिट अँड रन कायदा” त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने चिमूर विधानसभा कांग्रेस समन्व्यक डॉ. सतीश वारजुकर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गजानन बुटके,तालुका कांग्रेस अध्यक्ष डॉ विजय पाटील गावंडे यांचेसह विविध राजकीय, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवीला.