मोर्शी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी उमेश गुडधे यांची निवड !

92

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.4जानेवारी):-कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसह ‘आत्मा’अंतर्गतच्या योजनांबाबत सल्ला देण्यासाठी तालुका पातळीवर ‘आत्मा’ शेतकरी सल्लागार समिती काम करते. मोर्शी तालुक्यांत तब्बल चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून समिती नव्हती अखेर नव्याने समित्या करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी समितीच्या सदस्याची नावे पालकमंत्र्यांना कळवून आत्मा समित्यांना मान्यता देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील आत्मा समित्या गठीत करण्यात आल्या.

कृषी विभाग, आत्माच्या विविध योजना, प्रशिक्षणे, शेतीशाळांसह अन्य विविध उपक्रमांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या बाबत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आणि कृषी विस्ताराचा सल्ला देण्यासाठी कृषिभूषण, प्रयोगशील अभ्यासू शेतकऱ्यांची तालुका शेतकरी सल्लागार समिती आहे.

मोर्शी वरूड तालुक्यातील सदस्यांची निवड आमदार देवेंद्र भुयार यांनी केली असून मोर्शी तालुका आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उमेश देविदास गुडधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून समितीच्या सदस्यपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, नरेंद्र जिचकार, मंगेश देवहाते, दिपक पांडव, अंकुश तेदू, प्रवीण बेलखेडे, यादवराव खवले, सुनील चोपडे, अरविंद्र तटटे, अनिल अमृते, शितल देशमुख, किशोरी उमाळे, निलेश उघडे, विजय गांजरे लवकेश राउत, प्रवीण उमाळे, विपुल हिवसे, संदीप रोडे, रवींद्र लाकडे यांची कृषी विभागाच्या आत्मा सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.

मोर्शी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी उमेश गुडधे यांचे व सर्व निवड समितीचे आत्मा समितीवर निवड झाल्याबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष वृषालीताई विघे, माजी नगराध्यक्ष मेघनाताई मडघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, शहर युवक अध्यक्ष अंकुश घारड, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, पत्रकार अजय पाटिल यांनी अभिनंदन केले.