युवा ग्रामीण पत्रकार संघाची पुसद येथे पत्रकार दिनी संवाद बैठक संपन्न

123

🔸पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, गणेश कचकलवार यांची बैठकीला विशेष उपस्थिती

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

 पुसद(दि.7जानेवारी):-काल दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त पुसद येथील शासकीय विश्रामगृह
जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर बैठकीला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त या बैठकीला उपस्थित राहून पत्रकार संघाच्या अनुषंगाने विविध विषयावर उल्लेखनीय संघटनात्मक चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील अनेक प्रतिनिधी सदस्यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये प्रवेश करण्यात आला व प्राथमिक सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली व तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

येत्या काही महिन्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे
महाराष्ट्र राज्य लेव्हलवर महा अधिवेशन होणार
सर्वांनी तयारीला लागावे फक्त काही महिन्यांमध्येच आपल्या पत्रकार संघाची लक्षणीय सदस्य नोंदणी झाली असून सर्वांनाच आपण आपल्या युवा ग्रामीण पत्रकार सघामध्ये सामील करून घेणार आहोत आपण युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य पदाधिकारी म्हणून सर्वसामान्य व वंचित समूहाला न्याय देण्याचे काम प्राधान्य करावे व सर्वोच्च उद्दिष्ट ठेवून आपण या संघटनेत काम करीत आहात याचा मला अभिमान आहे आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या आजच्या दिनी शुभेच्छा देतो असे शेवटी मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष गणेश कचलवार म्हणाले.

यावेळी प्रमुख बैठकीला उपस्थित, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, जिल्हा सचिव राजेश सोनुने,जिल्हा महिला आघाडी रेश्मा ताई लोखंडे, पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड, पुसद ग्रामीण तालुकाध्यक्ष राजेश ढोले, पुसद तालुका उपाध्यक्ष शेख शब्बीर, तालुका सचिव कुलदीप सुरोशे, इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पत्रकार संघाचे पुसद तालुका संघटक ज्ञानेश्वर मेटकर, पुसद शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे, पुसद तालुका सह संघटक कैलास श्रावणे, तालुका सहसंघटक मारोतराव कांबळे,सुनील गंगाखेडे,समाधान वाढे, सूर्यकांत राठोड. इत्यादी प्रतिनिधी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते..