नांदेड -घुंगराळा -कुंटुर तळेगाव- उमरी – भोकर बस सेवा 30 जुलै पासून सुरू

26

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.31जुलै):-कोरोना या महामारीच्या काळात रेल्वे सेवा पूर्ण पने ठप्प झाली असून ग्रामीण भागातील लोकांना प्रवास सेवा मिळत नसल्यामुळे पन्नस शंभर रुपयात होणारा प्रवास पाचशे हजार रु देऊन करावा लागत आहे अशा परिस्थितीत नांदेड घुंगराळा कुंटुर बळेगाव तळेगाव उमरी ह्या 67 की मी च्या मार्गावर एकही बस सेवा नव्हती ह्या आत्यावश्यक बस प्रवास सेवेची ममगणी गेल्या महिनाभरापूर्वी तळेगाव* *ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी महामंडळास एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती यानंतर नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार उमरी प स उपसभापती शिरीष भाऊ गोरठेकर कुंटुर चे सरपंच रुपेश देशमुख कुंटुरकर यांनीही ही बस सेवा सुरू करावी म्हणून पाठ पुरावा केल्या मुळे ही बस आता 30 जुलै गुरुवार पासून सुरुवात होत असून 30 जुलै ला सायंकाळी ठीक 4 वाजता ही बस नांदेड हुन निघून 5 :15 वाजता घुंगराळा 5 : 45 वाजता कुंटुर 6 :15 ला तळेगाव उमरी हुन सायंकाळी 7 वाजता भोकर येथे मुक्कामी राहून सकाळी 7 वाजता भोकर वरून निघून 7 :45 वाजता उमरी 8 वाजता तळेगाव बळेगाव मार्गे 8 : 30 वाजता कुंटुर येथुन घुंगराळा मार्गे 9:30 वाजता नांदेड येथे पाहोचेल तरी ह्या मार्गावरील प्रवशानी ह्या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन तळेगाव विक्रम देशमुख सरपंच शेख नवाज उपसरपंच रुपाली उडतेवार रमिस बेग मोगल यांनी केले आहे