पहिले युवा मराठी साहित्य संमेलन-28 जानेवारीला पुण्यात होणार

117

🔸स्वागताध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर यांची माहिती

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.9जानेवारी):-राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलन दि. 28 जानेवारी रोजी पुणे येथील आंबेगाव पठारावर कै तुकाराम धोंडीबा कुंजीर विधी महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पुणे केंब्रिज शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर यांनी दिली.

साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला संमेलन स्वागत समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, सदस्य मयुर कुंजीर, स्मिता कुलकर्णी, स्वीटी सकपाळ, सुजाता निंबाळकर आदी उपस्थित होते.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, नवीन युवक व विद्यार्थी यांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वैभवशाली वारसा लाभलेला हा परिसर आहे. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो. 9881098481, 9011000606 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले आहे.