प्रा.अरुण बुंदेले महानायक पुरस्काराने सन्मानित

136

🔸माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त महानायक संघटनेतर्फे पुरस्कार प्रदान

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.13जानेवारी):-येथील साहित्यिक,अभंगकार,समाजप्रबोधनकर्ते व सामाजिक – शैक्षणिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्त्व प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजप्रबोधनात्मक कार्याबद्दल दि.१२जानेवारी २०२४ ला राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त महानायक संघटना महाराष्ट्र तर्फे आकर्षक सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन ” महानायक पुरस्कार -२०२४ ” सन्मानपूर्वक महानायक संघटनेचे प्रमुख व माजी नगरसेवक मा. सुरेशभाऊ मारोती मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते मा.रावसाहेब गोंडाणे व मा. प्रदीपभाऊ विघ्ने यांच्या शुभहस्ते कॅम्पस्थित राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ जिजाऊ सृष्टी अमरावती येथे प्रदान करण्यात आला.

सर्वप्रथम राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री जिजाऊंना हारार्पण करून अभिवादन केल्यानंतर ” निखारा ” काव्यसंग्रहातील ” राजमाता जिजाऊ ” हे वंदनगीत प्रा.अरुण बुंदेले यांनी सुमधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी मा.रावसाहेब गोंडाणे यांनी तसेच अध्यक्ष महानायक संघटनेचे प्रमुख मा.सुरेशभाऊ मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय दिला.सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांनी ” राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची गौरव गाथा ” या विषयावर विचार व्यक्त करून महानायक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संयोजकाचे आभार मानले.

प्रा.अरुण बुंदेले यांना यापूर्वी सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय व राज्यस्तरीय बावीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. “आदर्श अभ्यासाचे तंत्र ” व “अभंग तरंग ” या पुस्तकांसह त्यांचे अकरा पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि थोर पुरुषांच्या जीवनकार्यावरील लेखसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे समाजकार्य व लेखनकार्य सतत सुरूच असते.

याप्रसंगी प्रा.यशवंत मेश्राम,भारतभूषण उर्फ बंटीभाऊ रामटेके,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विनभाऊ चौधरी,मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ राऊत, बाळकृष्ण धर्माळे,संकेत पाटील, जीवन पांडे,रमेश तिडके,सुनील बाहेकर,बबन तांबे,निलेश तागडे, गजानन मेश्राम,कृष्णकांत ढोले,गंगाधर सरदार,गोवर्धन हरडे,बागडे काका,व्यंकटराव खोब्रागडे,मिलिंद कांबळे,सुरेशतीरथकर,अनिलभाऊ माहोरे,विवेक मातकर उपस्थित होते.”महानायक पुरस्कार -२०२४ ” मिळाल्याबद्दल प्रा.अरुण बुंदेले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .