पुढाकार सोहळा २०२३-२४ प्रा राम मेघे इंजि आणि मॅनेजमेण्ट बडनेरा कॉलजेला प्रथम पुरस्कार

121

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.15जानेवारी):-स्थानिक बडनेरा येथील प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अंतर्गत स्थापित रेड रिबन क्लब ला जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय अमरावती, ह्याच्या द्वारे त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची दखल घेत पहिला पुरस्कार जाहीर केला . प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना च्या रेड रिबन क्लब ह्यांनी एडस् संपवण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

त्यामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती, एच आई व्ही ची जनजागृती करण्याच्या उदधेशाने भव्य जनजागृती रॅली, विविध स्पर्धा, जनजागृती पर कार्यक्रम, मोफत एच आई व्ही तपासणी व आरोग्य तपासणी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते .सदर पुढाकार सोहळा २०२३-२४ दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र पंचवटी अमरावती येथे आयोजित केला होता.

प्राप्त पुरस्कारा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. जी. हरकुट यांनी रेड रिबन क्लब स्वयं सेवकांचे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम, प्रा. आशिष सायवान, ह्यांचे कौतुक केले.

महाविद्यालयाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्या बदल संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी अभिनंदन केले.