वरुड मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे निर्मितीकरीता ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध !

203

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे २४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार !

🔸शाश्वत जलसंधारनातून ड्रायझोन मुक्ती साठी माझा प्रयत्न – आमदार देवेंद्र भुयार

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.15जानेवारी):-मोर्शी तालुका ड्राय झोन मध्ये असून तेथे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असून मागील १४ वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे सिंचन प्रकल्पांचे काम रखडलेले असून ते सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त करण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे शेतीसिंचनासाठी वरदान ठरनाऱ्या वरुड मोर्शी तालुक्यातील कोल्हापुर पद्धतीचे नवीन बंधारे, द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यात ८ कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करून सुमारे ११ कोटी ८८ हजार ३४८ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

वरुड मोर्शी तालुक्यामध्ये ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे ८ कोल्हापुरी बंधारे निर्माण करणे करीता दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून यामध्ये वरूड मोर्शी तालुक्यातील धानोरा येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ७० लक्ष ९२ हजार रुपये, रिद्धपूर येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ६८ लक्ष ८५ हजार रुपये, उडखेड येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ७४ लक्ष ६८ हजार रुपये,वरूड तालुक्यातील भेमडी येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ३८ लक्ष २८ हजार रुपये, सूर्यखेडा येथील कळंब प. बंधारा निर्माण करणे ७९ लक्ष ३० हजार रुपये,फत्तेपूर येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ४० लक्ष ३८ हजार रुपये, सुरळी क्र. १ येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी ८ लक्ष ६९ हजार रुपये, सुरळी क्र. २ येथील को. प. बंधारा निर्माण करणे १ कोटी १९ लक्ष ७४ हजार रुपये, मंजूर करून मतदार संघातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे वरुड तालुक्यातील या ८ बंधाऱ्याची निर्मिती ११ कोटी ८८ हजार ७३४८ रुपये खर्च करून होणार असल्यामुळे वरुड तालुक्यातील या ८ कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ६२७.५९ स.घ.मीटर असून २४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत मुंबई येथे बैठक घेऊन आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे विशेष बाब म्हणून ११ कोटी ८८ हजार ३४८ रुपयांचा निधी देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील बंधारे निर्मितीसाठी शासनाने निधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांची विकासात्मक भूमिका महत्त्वाची ठरणारी असून मोर्शी वरूड तालुक्यामध्ये नवीन कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याकरीता भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.

शाश्वत जलसंधारनातून ड्रायझोन मुक्ती साठी माझा प्रयत्न — आमदार देवेंद्र भुयार
वरुड मोर्शी तालुक्याला ड्राय झोनचा लागलेला कलंक मिटविण्याकरीता, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरीता मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील जमिनीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी तसेच माझा मतदारसंघ ड्रायझोन पासून मुक्त व्हावा शेती सिंचनामुळे आर्थिक संपन्नता यावी, तरुण शेतकऱ्यांना वैभवशाली दिवस त्याच्या आयुष्यात निर्माण व्हावे याकरिता यशस्वी पाठपुरावा करून मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारनासाठी ८ कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याकरीता ११ कोटी रुपये मंजूर करून दिले — आमदार देवेंद्र भुयार