विद्यार्थ्यांनी द्येय समोर ठेऊन शैक्षणिक वाटचाल करावी:-प्रा.प्रशांत राऊत

134

🔸विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथे व्यवसाय मार्गदर्शन दिन साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18जानेवारी):-16 ते 20 वर्षे वय हे जीवन घडविणारे आहे.या वयात आत्मसात केलेले ज्ञान आपले भविष्य घडविणारे आहे. विद्यार्थी जीवनातील इयत्ता 9 वी ते 12 वी हे चार वर्षे अतिशय महत्वाचे आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी द्येय समोर ठेऊन शैक्षणिक वाटचाल करावी.असे प्रतिपादन प्रा.प्रशांत राऊत यांनी केले ते अर्हेरनवरगाव येथील विकास विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन दिना निमित्य आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी.धोटे,मार्गदर्शक म्हणून प्रा.मंगेश जराते,सहाय्यक शिक्षिका वैशाली धोटे,सहाय्यक शिक्षक केशव घरत,खरकाटे सर ,घनश्याम मेश्राम,श्रीहरी ठेंगरे,रामेश्वर वकेकार,शिक्षिका कूथे मॅडम उपस्थित होते.

प्रा. राऊत पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात वाईट व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे,मोबाईलचा अपव्यय वापर टाळावे.12 वी झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी अनेक क्षेत्र समोर येतात मात्र आपण ज्या क्षेत्रात पारंगत आहोत तो क्षेत्र निवडला तर ध्येय गाठण्यासाठी सोपे जाते.या शिवाय शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन केले.

तर प्रा. मंगेश जराते यांनी चालू घडामोडींवर प्रकाश टाकत विद्यार्थी जीवनात येणारे संकट व त्यावरील उपाय,यावर प्रकाश टाकत विद्यार्थी जीवनातील विविध उदाहरणे देऊन ग्रामीण जीवनशैलीतून विद्यार्थी कसे घडतील यावर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक एम.बी.धोटे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक केशव घरत यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वैशाली धोटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.