विश्वास मोहिते यांच्या घर तिथं संविधान उपक्रमाला वाढता पाठिंबा

625

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.20जानेवारी):-पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या माध्यमातून विश्वास मोहिते यांनी राबविलेल्या घर तिथं संविधान या उपक्रमास युवा वर्गातून विशेष पाठबळ मिळत असून गावोगावी विश्वास मोहिते यांचा गौरव केला जात आहे.

कराड तालुक्यातील पाडळी (केसे ) गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास बाबुराव मोहिते यांनी संपतराव मोहिते, पाडळी (केसे ) ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा निरीक्षक अशोक मस्के,पाडळी (केसे ) च्या माजी सरपंच शबाना मुजावर, शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे, श्रीकांत कांबळे, युवराज कांबळे,सागर जाधव म्होप्रे, माजी जि. प सदस्य सविनय कांबळे, पत्रकार विद्या मोरे, ऍड.स्वप्नील भिसे, उमरफारूक सय्यद यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ‘युवकांना स्वतःचे अधिकार कर्तव्य याची माहिती व्हावी, सर्व सामान्य लोकांना संविधानाची जान व्हावी म्हणून *घर तिथं संविधान* हा उपक्रम हाती घेतला आहे.

या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील जवळपास 100 तालुक्यातील निवडक 500 गावात जाऊन संविधानाची काही निवडक माहीती देणार असल्याचा त्यांचा संकल्प आहे. घर तिथं संविधान यांचा कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शुभारंभ नुकताच केला होता. या उपक्रमासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या. कराड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी त्यांनी युवकांना तसेच दलित, वंचित आणि उपेक्षित घटकांतील लोकांना संविधानाबादल त्यांच्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न केला.कराड तालुक्यातील पाडळी (केसे), किरपे, केसे, संजयनगर- शेरे या गावासह पाटण तालुक्यातील खटाव तालुक्यातील काही गावातील लोकांना संविधानाबद्दल माहिती दिली.

एवढेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावातही संविधानाची माहिती दिली. यावेळी विशेष कामगिरी बद्दल आणि एका घर तिथं संविधान या अनोख्या उपक्रमाबद्दल विश्वास मोहिते, अशोक मस्के यांचा वाखरी येथे अण्णासाहेब वाघमारे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय उपक्रमास शुभेच्छा दिल्या. राष्ट्र उद्धाराच्या भावनेने करीत असलेल्या विश्वास मोहिते यांच्या घर तिथं संविधान उपक्रमास राज्यातील विविध जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे.