नामदेव महाराजांचा वंशज यांचेवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे

7

🔸विश्व वारकरी सेनेची मागणी

✒️माधव शिंदे (नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.1ऑगस्ट):-विश्व वारकरी सेना भारत नायगाव तालुक्याच्या वतीने आपल्या विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालय नायगाव जिल्हा नांदेड यांच्यामार्फत देण्यात आले. नामदेव महाराजांच्या वंशज यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी पासूनच भजन-कीर्तन करण्याकरिता किमान 50 भाविकांना नियम व अटी लावून परवानगी देण्यात यावी, झी मराठी या वाहिनीवर फु बाई फु या कार्यक्रमांमध्ये निलेश साबळे, ऋषिकेश जोशी, लीना भागवत, यांनी किर्तन परंपरेचा अपमान केल्याबद्दल व धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.तो गुन्हा मागे घेण्यात यावा महाराष्ट्रातील देवस्थाने नियम व अटी लावून उघडण्यात यावे ध्वनिक्षेपण नियम मंदिर मज्जित करिता एक सारखा असावा अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर विश्व वारकरी सेनेचे नायगाव तालुकाध्यक्ष ह. भ. प.नागोराव मारोती तिप्पलवाड (एन टी सर बरबडेकर), उपाध्यक्ष गंगाधर गणपती नरंगले, सचिव ह.भ.प.श्याम पाटील नरंगलकर, सल्लागार ह भ प पंढरीनाथ महाराज पळसगावकर, संपर्कप्रमुख ह भ प श्रीधर गोपीनाथ पांचाळ, कार्याध्यक्ष बालाजी पाटील सावळे, शिवाजी हासेवाड बरबडा वाडी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक भाविक महाराज उपस्थित होते .