पुणे येथील अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत दहा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर

162

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24जानेवारी):-महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाच्या पत्रकारांसाठी असलेल्या अधिस्विकृती समितीची दुसरी बैठक आज पुणे येथील विभागीय कार्यालयात झाली.

या बैठकीला समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे,सदस्य सचिव तथा पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर राजू पाटोदकर, समितीचे सदस्य गोरख तावरे ,चंद्रसेन जाधव ,सूनित भावे ,सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे ,पुणे जिल्हा माहिती अधिकारी मोघे, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांच्यासह माहिती उपसंचालक व तीनही जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील संबंधित कर्मचारी तसेच अधिकारी राहुल पवार व इतर उपस्थित होते.

बैठकीत सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील अकरा प्रस्ताव पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या समोर आले .त्यापैकी दहा प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्य समितीकडे पाठवण्यात आले आहेत.राज्य समिती साठी पुणे विभागातून पत्रकारांच्या हिताचे काही ठराव ही पाठवण्यात आले .अधिस्वीकृती पत्रिका मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तपासणी करून त्याला मंजुरी देण्यात येते. ग्रामीण भागातील काही जेष्ठ पत्रकारांना अद्याप अधिकृत पत्रिका मिळाली नाही. काहींना आयकर भरत असल्याने सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही.

याबाबत काही सुट देवून नव्याने नियमावली लागू करण्यात येण्यासाठी सद्यस्थितीत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याबद्दल या समितीचे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वतीने जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर, अजित जगताप व डायनेल खुडे मान्यवरांनी आभार मानले आहेत. सद्या रेल्वे प्रवास सवलत शुल्क अधिस्वीकृती पत्रकारांना मिळत नाही. ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.