संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळ्याचे आयोजन

330

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24जानेवारी):-नाभिक युवा बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठा व अनावरण लोकार्पण सोहळ्याच्या आयोजन दिनांक २६ व २७ जानेवारीला करण्यात आले आहे.

२६ जानेवारी रोज शुक्रवार ला सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठा पुजा विधी व हवणाच कार्यक्रम असेल तर दुपारी १२ वाजता ह.भ.प. ओमदेव चौधरी महाराज यांचे समाज प्रबोधनाचे किर्तनाचा कार्यक्रम राहील.दुपारी ३ वाजता शहरातुन कलश व शोभायात्रा काढण्यात येईल.दुपारी ४ वाजता महिलांच्या हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जाईल.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. रिताताई उराडे नगराध्यक्ष न.प. ब्रम्हपुरी तर प्रमुख अतिथी सौ.स्मिताताई पारधी माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, सौ.ज्योतीताई उरकुडे ग्रा.पं. सदस्य एरंडी, सौ. ज्योतीताई मेश्राम माझी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रा. प . खेड, पपीताताई सुर्यवंशी उपसरपंच ग्रां पं. बेटाळा यांची उपस्थिती राहील, तर सायंकाळी ६वाजता सांस्कृतिक कार्यक्रम असेल.

२७ जानेवारी रोज शनिवार दुपारी २ वाजता श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण लोकार्पण सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक मान. आ.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, सह उद्घाटक मा. क्रिष्णाभाऊ सहारे माजी उपाध्यक्ष जिल्हा प .चंद्रपूर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी उपाध्यक्ष म्हणून मा. प्रकाशजी पोरड्डीवार अध्यक्ष नागरी सहकारी बँक गडचिरोली, सह उपाध्यक्ष मा. नामदेवजी किरसान सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली,तर दिपप्रज्वलन मा.डाॅ. नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली मा. क्रिष्णाभाऊ गजबे आमदार आरमोरी, मा.प्रमोदभाऊ चिमुरकर जि.प. सदस्य चंद्रपूर तर विशेष अतिथी म्हणून मा.राजेशजी कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर मा.अशोकजी भैय्या प्रथम नगराध्यक्ष न.प. ब्रम्हपुरी, मा.अशोकजी रामटेके उपनगराध्यक्ष न.प. ब्रम्हपुरी, मा.दिवाकरजी निकुरे साई डेव्हलपर बिल्डर नागपूर,मा. नेताजी मेश्राम माजी प.स. सभापती ब्रम्हपुरी, मा. दिपकजी उराडे सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हपुरी ,नानाजी तुपट माजी कृ.उ. बा.स.सदस ब्रम्हपुरी, मा.अॅड. गोविंदराव भेंडारकर माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रपूर, मा.प्रेमलाल धोटे ब्रम्हपुरी, मा.मोंटुभाऊ पिल्लारे सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हपुरी, मा.डाॅ.सागरभाऊ माकडे ब्रम्हपुरी, मा.अविनाशभाऊ राऊत सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हपुरी, मा.अॅड हेमंतभाऊ उरकुडे ब्रम्हपुरी, मा. अभिप्राय मानापुरे इंजि.ब्रम्हपुरी ,मा. विनोद झोडगे सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हपुरी ,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित मा.डॅ.संदिप लांजेवार नागपूर, मा हरीशजी ससनकर लेखक (शिवरक्षकजिवाजी महाला) बल्लारपूर ,मा. राजेश बारसागडे ज्येष्ठ कवी सावरगाव यांची उपस्थिती राहील.

प्रस्तुत कार्यक्रम हा वैनगंगेच्या पंचक्रोशीत ब्रम्हपुरी शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असल्याने श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांचे भक्तगणांना मध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक भक्त “याचा देही याची डोळा” अनुभवन्यासाठी आवासुन वाट बघत आहेत.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक युवा बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी, नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी, नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी,सलुन असोशियेशन ब्रम्हपुरी, नाभिक युवा आघाडी ग्रामिण विभाग ब्रम्हपुरी व नाभिक युवा महिला आघाडी ग्रामिण विभाग ब्रम्हपुरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.