मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावभेटी वेळी तेच चेहरे,, त्याच समस्या,, तीच बातमी

329

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25जानेवारी):-महाराष्ट्राचे कर्तबगार व धाडसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील तापोळा परिसरातील दरेगाव चे सुपुत्र आहेत. आज दीड वर्षाचा कालावधी झालेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना राबवले आहेत. पण त्यांच्या दरे गाव भेटीच्या वेळेला तेच चेहरे, त्याच समस्या आणि तीच बातमी, तोच उत्तर या चौकडीला आता लोक कंटाळले असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षातून बाहेर पडून स्वबळावर शिवसेना व अपक्ष ४०आमदारांची फौज घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राचे राजकारण फिरवून दाखवले. सुरत , गुवाहाटी असा प्रवास करून ते मुंबईत विसावले. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीने ते आपल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात आले होते.

त्यावेळेला पोलीस यंत्रणा ,सातारा जिल्हा प्रशासन व प्रोटोकॉल प्रमाणे खूप मोठी धावपळ करण्यात आली.आता हा त्यांचा चौथ्यांदा गावच्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त दौरा झाला. या दौऱ्याला त्यांनी आपला आवडता शेती उद्योग करून काही पत्रकारांना अक्षरशः आयुर्वेदिक असलेली कच्ची हळद खायला घातली. पूर्वी ग्रामीण भागात लग्नाला आलेल्या मुलीला पी हळद आणि हो गोरी…. असा सल्ला दिला जात होता. आता मुख्यमंत्र्यांनी थेट काही पत्रकारांना खा हळद आणि दाखवा चांगली बातमी… असा संदेश दिला आहे काय काय ? अशी आता विचारणा होऊ लागलेली आहे.

मुळातच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्त सामान्य माणसांना भेटता यावे. त्यांच्या समस्या ऐकण्याची संधी होती पण, खास हळदीचा तुकडा खाण्यासाठी केलेल्या काहींना ही हळद कडू लागली असली तरी गोड मानून घेतलेली आहे. हळदीचे लोणचे, जी व आयुर्वेदिक औषध म्हणून सुद्धा नियमितपणे घेण्याची तयारी आता काहींनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये सातारा जिल्ह्यातील सामान्य भागातील कष्टकरी, शेतमजूर, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर गतीने प्रयत्न व्हावेत. अशी अपेक्षा होती. पण, राजकीय तेच प्रश्न,, तेच उत्तर अजूनही दीड वर्षे झाली मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या टिकेतून बाहेर पडलेले नाहीत.

त्यांनी त्यातून बाहेर पडून आपले सकारात्मक विचार व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान, दरे येथे झालेल्या जनता दरबारामध्ये पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हे प्रोटोकॉलचा अतिरेक करत असल्यामुळे अनेकांना आपला दुर्गम भागातील हेलपाटा वाया गेला असल्याची खंत व्यक्त केली आहे. याचा आता थेट मुख्यमंत्री व त्यांच्या निकटवर्ती यांनी आत्मचिंतन करून उपाययोजना करावी. अशी मापक अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी करत आहेत.