माढा लोकसभेसाठी म्हसवड येथे शांततेत मतदान; उन्हाची तीव्रता पण उत्साह कायम

147

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*

 

म्हसवड :म्हसवड येथे मंगळवारी मतदान प्रकिया शांततेत पार पडली. या परिसरातील अनेक गावात मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या. दिव्यांग आणि वृद्धांसाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

म्हसवड व परिसरातील गावागावात मतदानादिवशी कोणताही अनुचित
प्रकार घडू नये यासाठी म्हसवड पोलिसांच्या वतीने चोख् पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल होता. प अनेक गावात मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. या परिसरातील अनेक गावात मतदान शांततेत पार पडले.
यावेळी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह पहायला मिळाला मतदाणाच्या पार्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने वैशिष्ट्य पूर्ण मतदान केंद्राची संकल्पना राबविली होती यामध्ये युवा मतदान केंद्र, जय जवान, जयकिसान अशी काही मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती आकर्षक पद्धतीने मतदान केंद्रे सजविण्यात आली होती या ठिकाणी तरुण मतदार सेल्फी काढताना दिसत होते.
मतदान केंद्रावर ज्येष्ठना आनी दिव्यांगाना ने आन करणेसाठी व्हील चेअरची व्यवस्था होती, थंड पाणी, वैध्यकीय सुविधा अशा विविध सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या होत्या