सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने गंगाखेड येथे आनंदोत्सव साजरा

76

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29जानेवारी):- सकल मराठा समाज समितीचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष करत ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दि.29 जाने सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नियोजित जागेच्या ठिकाणा वरून मराठा बांधव विजययात्रा काढत गुलालाची उधळत करत मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक विजय यात्रा वाजत गाजत काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

“मनोज जरांगे पाटील आगे बढो,हम तुम्हारे साथ है “अशा घोषणा देत डीजेच्या तालावर नाचत नाचत आनंदी उत्सव साजरा करीत असताना फटाक्याची अतिशबाजी सुद्धा करण्यात आली.

मराठा आरक्षण ऐतिहासिक विजयी यात्रेचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,या महापुरुषांच्या घोषणा देत समारोप करण्यात आला.अहिल्याबाई होळकर चौकातून निघालेल्या जल्लोषसास गंगाखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या उपस्थित कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे शांततेत समारोप झाला.