दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

143

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 29 जानेवारी):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ,जिल्हा शाखा यवतमाळ (पश्चिम) तर्फे 75 वा प्रजासत्ताक दिना निमित्ताने दि. 26 जानेवारी 2024 ला बोधिसत्व बुद्धविहार यवतमाळ येथे संस्थेच्या जिल्हा शाखा कार्यालयाचे उद्घाटन अॅड.अरूण मोहोड साहेब सरकारी वकील यवतमाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच संस्थेचे दप्तर कपाटाचे उद्घाटन डाॅ. एस.एस.मोरे अधिष्ठाता वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ यांचे हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषाताई खंडारे केंद्रीय शिक्षिका यवतमाळ यांनी केले.

या प्रसंगी डाॅ. एस.एस.मोरे साहेब यवतमाळ, अॅड. अरूण मोहोड साहेब यवतमाळ, आद.डाॅ. गुजर साहेब यवतमाळ,अॅड.पचगाडे साहेब यवतमाळ,डाॅ. इंगोले साहेब यवतमाळ, सिद्धार्थ बनसोड तालुका उपाध्यक्ष यवतमाळ,जयकुमार भवरे केंद्रीय शिक्षिका यवतमाळ यांनी पुढील धम्मकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी नागोराव बनसोड अध्यक्ष आर्णि तालुका-या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रूपेश वानखडे जिल्हासरचिटणीस यांनी केले तर आभार गौतम कुंभारे यानी मानले.