तहसीलदार साहेब खळी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ मिळतोय का बघा

87

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30जानेवारी):-गंगाखेड तहसीलच्या समोर सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उप अभियंता बालाजी पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अमरण उपोषण सुरु होते तर त्यांच्याच पिंपळदरी येथील दलित वस्तीतील कामाच्या कारनाम्याच्या विरोधात गावकऱ्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली होती.एकाच अधिकार्याच्या विरोधात दोन उपोषण सुरु होते.

तर यादरम्यान मनसेच्या शेतकरी सेनेच्या राज्य उपाध्यक्षाच्या विरोधात सरकारी कामात आडथळा खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद उप अभियंता बालाजी पवार यानी दिल्याने वातावरण तापले होते त्यामुळे अधिकार्यांची धावपळ सुरू झाली व गोची सुध्दा झाली.व गंगाखेड चे तहसीलदार प्रदीप शेलार हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने चक्कं मध्यरात्री उपोषण स्थळी गेले एरवी जनतेच्या कामांसाठी कार्यालयात न दिसणारे नागरिकांचे फोन न उचलनारे अधिकारी उपोषणार्थीची मनधरणी करण्यांसाठी मध्यरात्री सुद्धा जावु शकतात.किती ही कार्य तत्परता..

अधिकार्यानी प्रामाणिकपणे आपल्या अधिकाराचा वापर केला तर जनतेला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही पण..

कारण आतापर्यंत नागरिकांच्या समस्या वर कोण चौकशी करतय कोण दोषी.कोण निर्दोष यांचा पता कोणालाच लागतं नाही हे आज चे वास्तव आहे.
आज तालुक्यातील एक ही कार्यालय नाही जिथे नागरिकांच्या अधिकाराचे हनन होत नाही आणी भ्रष्टाचार होत नाही.कारण अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाक नाही मध्यरात्री जावुन उपोषण सोडवण्याची तसदी घेणारे तहसीलदार यांनी आता नुसतेच चौकशीचे खलीते पाठवण्यापेक्षा थेट घटनास्थळी जावुन प्रत्यक्ष पंचनामा करुन स्वतः अहवाल पाठवला तर कामात गती येईल व लोकांचा प्रशासनावरचा उरलासुरला विश्वास अबाधित राहील.

त्यामुळे साहेबानी थेटपणे जनतेचे गार्हाने ऐकुन दोषींवर जाग्यावर कारवाई करा.उपोषन सोडवण्यासाठी जसा मध्यरात्री चा मुहुर्त साधला तसा खळी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी भर दुपारचा मुहुर्त मिळतोय का बघा..आणी दलित वस्तीतील कामाच्या घोटाळेबाजांना पाठीशी घातले जाणार नाही याची काळजी घेतली तर आपल्या कार्यतत्परतेची प्रशंसा होईल.