सैय्यद सलमान यांना संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

96

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जानेवारी):-येथील गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूलचे शिक्षक तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमी आपले योगदान देणारे सैय्यद सलमान सै.शेरू यांना नागपूरच्या अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य व कला मंचा तर्फे या वर्षीचा संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून मोजक्याच लोकांची निवड करण्यात आली, त्यामध्ये सय्यद सलमान सर हे एकमेव मुस्लिम तसेच सर्वात कमी वयाचे पुरस्कार मानकरी होते ही बाब सुद्धा विशेष आहे. सरांचं कार्य हे सामाजिक प्रबोधनाचे तसेच जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, सद्भावना निर्माण करण्याच आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.अब्दुल कलाम यासारख्या सर्वच महापुरुषांचे विचार आपल्या व्याख्यानातून मांडतात तसेच सरांचं संत साहित्यावर सुद्धा अभ्यास असल्यामुळे धार्मिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य तसेच त्यावर लेख सुद्धा लिहितात.

सोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यु.पी.एस. सि व एम.पि.एस. सी तसेच पोलिस भरती अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन अवघ्या महाराष्ट्रात मोफत करतात. विशेष म्हणजे सरांनी आपले शिक्षण अत्यंत बिकट परिस्थिती पूर्ण केले आणि आपल्या जिद्द, चिकाटी आणि महेनतीच्या बळावर जीवनात यश मिळविले म्हणून आज गरीब आणि होतकरू मुलांनी सुद्धा सैय्यद सलमान सरांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपले शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले पाहिजे. सरांच्या या सर्वच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाहून त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला आहे.