पी.आर.हायस्कूलमध्ये आर.बी. सूर्यवंशी सर स्मृतीप्रीत्यर्थ बक्षीस समारंभ

77

✒️पी. डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(डी.1फेब्रुवारी):- येथील शतकोत्तरी पी. आर.हायस्कूलचे दिवंगत उपमुख्याध्यापक आर. बी. सूर्यवंशी सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या English Story Telling and English Essay Writing Competition चा बक्षीस वितरण समारंभ झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अजय पगारिया होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक मोहनसिंह सूर्यवंशी गुरुकृपा हॉटेलचे संचालक देवालाल सिंह बायस, राजपूत समाजाचे पंच सदाशिवसिंह सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक कैलास वाघ हे होते. प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक डॉ.सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून आर.बी.सूर्यवंशी सरांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

सूर्यवंशी सर म्हणजे एक चालतं बोलतं संगणक होते, साने गुरुजी कथामाला आणि विज्ञान प्रदर्शनातून शाळेला व व विद्यार्थ्यांना नावलौकिक मिळवून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या १५० विद्यार्थ्यांनी या व परीक्षकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. सोनार, व्ही.एच.चौधरी ,पी. व्ही. असोदेकर ,एस. के. बेलदार, दिनेश सूर्यवंशी, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले.