महात्मा फुले हायस्कूल शाळेचा शासकिय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत १००% निकाल

112

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.2फेब्रुवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा साला- बादा प्रमाणे यावर्षी देखील शासकिय इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

२०२३ -२०२४ या शैक्षणिक वर्षात शाळेतून १६ अर्ज प्रविष्ट केले होते यामध्ये १६ च्या १६ विद्यार्थी अ, ब व क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक एच डी माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेतील कलाशिक्षक एच.डी.माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.