संस्कारक्षम समाजासाठी शब्दगंधचा प्रयत्न: दिगंबर गोंधळी

69

✒️नेवासा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नेवासा जि.अहमदनगर(दि.5फेब्रुवारी):-शब्दगंध साहित्यिक परिषद, नेवासा तालुका शाखेचे पदाधिकारी तालुक्यातिल गावागावात जाऊन पुस्तके मोफत वाचण्यास देऊन संस्कारक्षम समाज बनविण्याचा प्रामानिक प्रयत्न करित आहेत. वाचनारांची सक्षम पिढी घडविण्यासाठी हे प्रयत्न निश्चितच उपयुक्त आहेत.* असे मत शब्दगंधच्या नेवासा शाखेचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी व्यक्त केले.

ते शब्दगंधच्या ‘फिरते मोफत वाचनालय आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत दिघी गावात बोलत होते. समवेत शाखा सल्लागार माजी कुलगुरू डॉ.अशोक ढगे, अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर धनवटे व पांडुरंग रोडगे होते.

यावेळी प्राचार्य धनवटे यांनी ग्रामस्थांना वाचनाचे महत्व विषद केले तर डॉ.अशोक ढगे यांनी उपक्रमाची माहिती दिली . यावेळी ग्रामस्थ रंभाजी ब्राह्मणे,विजय निकम,दत्तात्रय काळे, बापूसाहेब नागोळे,निवृत्ती काळे,जगन्नाथ गवळी, दगडू आढागळे, अर्जुन निकम, रावसाहेब निकम, नानासाहेब साळुंखे , संजय चव्हाण , भानुदास हापसे, बाबासाहेब सरोदे , किसन करपे , अशोक गव्हाणे, आदिनाथ औताडे , संदीप निकम , सुनील देशपांडे , रवींद्र ब्राह्मणे , संदीप आढागळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. या उपक्रमास शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्यासह अनेकांचा सक्रीय सहभाग आहे.