मातीमध्ये घाम गाळणाऱ्यांचा सत्कार ही प्रेरणादायी गोष्ट

167

✒️नेवासा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुकाणा ता.नेवासा(दि.5फेब्रुवारी):- मातीमध्ये घाम गाळणाऱ्या, मातीचे गाणे गाणाऱ्या आणि कुटुंबीयांवर मायबापा एवढं प्रेम करणाऱ्या लोकांचा सत्कार करून आमच्या कुटुंबीयाने उजेडाच्या वाती विजू दिल्या नाहीत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सत्कार करणे ही प्रेरणादायी गोष्ट आहे. असे प्रतिपादन श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.

आदर्श माता लक्ष्मीबाई कानडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय कडू भाऊ कानडे यांच्या 35 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सहकारी व विविध क्षेत्रातील नामांकितांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर जिल्हाधिकारी तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यकारी संचालक गुलाबराव खरात, त्रिमूर्ती चे संस्थापक साहेबराव धाडगे, पार्थ विद्या प्रसारक समाजाचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती सचिन गुजर,प्रमुख वक्ते , सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे हे होते.

पुढे बोलताना आमदार कानडे म्हणाले की,मायेचा गोडवा अलौकिक असून संघर्षाने आयुष्य उजेडाचे केले आहे आणि त्यामुळेच अंधार कुठच्या कुठे पळाला आहे. या भागातील तत्कालीन पैलवान व कर्तुत्ववान व्यक्तींचा विशेष सत्कार होत असल्याने आनंद होत आहे.

यावेळी प्रल्हाद शिंदे, प्रभाकर लांगे, साहेबराव कदम, बारकू पाताळे,जनार्धन गटकळ, कचरू निकम, प्राचार्य जी.पी.ढाकणे, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,डॉ.विजय देशमुख, संभाजी निकाळजे, कोमल वाकळे,सोनाली बर्डे, रिंकल हाडके, योगिता खेडकर, प्रतीक ठक्कर, अनुज पाटील,राहुल धनवटे, सेवानिवृत्त एस पी इंदुरकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.

गुलाबराव खरात यांनी यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला तर एडवोकेट सुरेश आव्हाड यांनी या कुटुंबीयांच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले तर शेवटी तुरुंगाधिकारी रेवन्नाथ कानडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे, भानुदास वाघमारे, माजी नगरसेवक अशोक कानडे, कवी सुभाष सोनवणे, सरपंच रिंधे, कवयित्री शर्मिला गोसावी, माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सुरेश मिसाळ,मुख्याध्यापक शरद मेढे, छबुराव फुंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनाथ कानडे, संजय कानडे, अनिता कानडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.कवी अनंत राऊत यांचे आई-वडिलांवरती कवितांसह व्याख्यान झाले. सर्व नामांकितांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.परिसरातील अनेक महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.