सातारा जिल्हा परिषदेच्या सी. ई. ओ. पदी श्रीमती यशनी नागराजन यांची नियुक्ती

135

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6फेब्रुवारी):-महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे रणकंदन सुरू होण्यास अवधी आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करत आहे. अशावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या सि.ओ. ज्ञानेश्वर खिलारी यांच्या जागी श्रीमती यशनी नागराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात महिला पदाधिकारी म्हणून श्रीमती नागराजन आल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोणतेही काम करत असताना अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. परंतु, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तीन वेळा अपयश येऊन सुद्धा बी टेक प्रशिक्षण घेतलेल्या यशनी नागराजन यांनी हार मानली नाही.

अखेर चार वर्षांपूर्वी त्यांनी आई एस परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संपूर्ण भारतामध्ये २०१९ आली५७ रँक त्यांनी प्रदान केली. यापूर्वी त्यांनी भारतीय रिझर्व बँक व विदेशी मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन आपला आय. ए. एस. बनण्याचा मार्ग सुखकर केला आहे.

दलित- पददलित – आदिवासी समाजाला न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम व आता महाराष्ट्राच्या केडर मध्ये काम करण्यात सुरुवात केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेला खूप मोठी परंपरा आहे. परंतु, अलीकडच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे काही अधिकारी वर्गाच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता एकवटली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आली होती. कारण, सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये शितलता आली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी राखून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय मिळत होते. आता हे सर्व बंद होऊन पुन्हा एकदा निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित होणार आहे. तत्पूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे सिओ म्हणून श्रीमती यशनी नागराजन कोणत्या पद्धतीने काम करतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.