गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार गांगर्डे,राठोड,खेडकर,शेख,पुरी यांना जाहिर

246

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.6फेब्रुवारी):– “शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले शिक्षक बंधू राम दादाबा गोसावी गुरुजी व त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वॉरियर्स फाउंडेशन,अहमदनगर कडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी 2022 करिता बाळासाहेब गांगर्डे, व संदीप राठोड यांची तर 2023 करिता बाळासाहेब खेडकर व नजमा शेख,सुजाता पुरी यांची निवड करण्यात आली” असल्याची माहिती वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी यांनी दिली.

नांदेवली,मातोरी, खळेगाव ता.गेवराई, तळणी, घोटण ता.शेवगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेले राम दादा गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 2022 चा पुरस्कार संदीप राठोड,ज्ञानाअंकुर शिक्षण संस्था, निघोज यांच्या ‘भूक छळते जेव्हा’ या काव्यसंग्रहास तर 2023 चा पुरस्कार लक्ष्मण खेडकर,जि.प.प्राथमिक शाळा,ववा ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक लक्ष्मण खेडकर यांना क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गुहा,देवळाली प्रवरा, शेटेवाडी ता.राहुरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेले त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा 2022 चा पुरस्कार जि.प.प्राथमिक शाळा,साकुरी येथील बाळासाहेब गांगर्डे यांच्या ‘कष्टाळू माय बाप’ या लेखसंग्रहास तर 2023 चा पुरस्कार जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा, वहाली,ता.पाटोदा येथील नजमा शेख व जि.प.प्रा.शाळा,वडगाव गुप्ता येथील सुजाता पुरी यांना क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर पाठीमागे, सावेडी, अहमदनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात सदर पुरस्कार वितरण केले जाणार असून स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

तरी या पुरस्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सौ.संगीता गिरी,अनिता कानडे,भामा गोसावी,आरती गिरी यांनी केले आहे.