त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

213

🔸बौद्ध उपासिका महिलांची प्रामुख्याने उपस्थिती

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7फेब्रुवारी):-गंगाखेड शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी रमाई आंबेडकर यांच्या 126 वी जयंती दि 07 फेब्रु रोजी सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर जाहीर व्याख्यानचे आयोजित करण्यात आले असून रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे व व्याख्याते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव व्याख्याते डी.वाय.खेडकर,संत जनाबाई महाविद्यालयाचे डॉ. प्रा.एम. डी. इंगोले,यांची याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक भंते पी.धम्मानंद,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडितराव पारवे,नगर परिषद मुख्याधिकारी जयंत सोनवणे,स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे,लखन अण्णा साळवे,संभाजी साबणे,चंद्रगुप्त घनसावंत,पदमीनबाई मस्के,तुकाराम ढगे,गौतम वाघमारे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना संत जनाबाई महाविद्यालयाचे प्रा.इंगोले म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा इतिहास पाहत असताना स्वाभिमानी,कष्टाळू, शीलवान,गुणवान व त्यागी व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून येत आहे रमाई आंबेडकर यांचे दानशूर व्यक्तिमत्व सांगत असताना असे दिसून येते की, त्या परिस्थितीमध्ये वस्तीग्रहातील विद्यार्थी उपाशीपोटी असताना दिसताच रमाई आंबेडकर यांनी स्वतःच्या गळ्यातील सोने विकून विद्यार्थ्यांचा भाकरीचा प्रश्न मिटवला होता.त्याबरोबरच रमाईनी संसारिक जीवनातील अडचणी लक्षात घेता

डॉ.बाबासाहेबआंबेडकरांना संसारातील कोणत्याही अडीअडचणी समस्या कधीही सांगितल्या नाहीत त्यामुळेच आज परिस्थितीमध्ये प्रत्येक नारीने/महिलांनी रमाई आंबेडकर यांचाआदर्श घेऊन शिक्षणावर काम करत असताना आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षण देऊन इतिहास घडवला पाहिजे.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव डी.वाय.खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत रमाई आंबेडकर यांचा जीवन प्रवास सांगितला.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन आण्णा साळवे,पी.एस.पारवे.चंद्रगुप्त घनसावंत,संभाजी साबणे,हरि नरवाडे,नवनाथ साळवे,सखाराम पंडित,बी.व्ही.आवचार,विश्वनाथ महादुळे, प्रकाश परतवाघ,बालासाहेब पारवे,डि.एस.प्रधान,महादेव पंडित,नाना लांडगे,कृष्णा सावंत, शिवाजी गायकवाड,वामन महादुळे,गंगाधर गायकवाड,रमेश साबणे,श्रावण गायकवाड,नवनाथ खंदारे,गोरखनाथ कांबळे,राधाकिशन जडे,अशोक वावळे,लहू केदारे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जोंधळे आभार राहुल साबणे यांनी करत कार्यक्रमाचा समारोपात संतोष हनवते याच्या वतीने खिचडी दान करण्यात आले.