22 व्या राज्यस्तरीय म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी प्राचार्य डॉ.उद्धव जाने यांची निवड

111

🔸प्रा.श्रीकृष्ण बनसोड व प्रा.अरुण बुंदेले यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.उद्धव जाने यांचा सत्कार संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.8फेब्रुवारी):-स्थानिक वऱ्हाड विकास येथे 22 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड झाल्याबद्दल ख्यातनाम शिवचरित्र अभ्यासक प्राचार्य डॉ.उद्धव जाने यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन संमेलनाचे प्रवर्तक प्रा.श्रीकृष्ण बनसोड व कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी भावपूर्ण सत्कार केला.प्रथम महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

……

22 वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे शनिवार दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी उत्क्रांती शिक्षण संस्था जरूडच्या भव्य प्रांगणातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

……..

याप्रसंगी प्राचार्य डॉ.उद्धव जाणे यांनी, ” फुले – आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची गरज व्यक्त केली.”महात्मा फुले लिखित “गुलामगिरी” ग्रंथाला जुलमी लोखंडी शृंखलातून मुक्त करून ते संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

…….

उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी,”महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय विचाराने देशात समता व धर्मनिरपेक्षता प्रस्थापित होऊ शकते.”असे मत व्यक्त केले .
….

प्रा.अरुण बुंदेले यांनी,” महापुरुषांचे विचार हे सामाजिक एकता व देशाच्या अखंडतेसाठी अनिवार्य असल्याचे म्हटले.”

संमेलनाचे उदघाटक डॉ.उद्धव जाने सर कला व विज्ञान महाविद्यालय,कामरगाव, जि.वाशीम येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.ते शिवचरित्र अभ्यासक असून महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यानमालांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,राजमाता जिजाऊ यांच्यावर व्याख्याने संपन्न झालेली आहेत.संत तुकाराम,संत गाडगेबाबा,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी थोर पुरुषांच्या जीवन कार्यावर विद्यापीठ तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये व्याख्याने दिलेली आहेत.
” काळजातली कस्तुरी ” हा मराठी कविता संग्रह प्रकाशित आहे.त्यांचा अनेक साहित्यिक आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग आहे.त्यांचे राष्ट्रीय पातळीवर एकूण अठ्ठावीस शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.वर्तमानपत्रातून अनेक विषयांवर लेख,कविता व कथा प्रकाशित झालेल्या आहेत.

अशा प्रज्ञावंत अभ्यासकाची संमेलनाच्या उद्घाटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आयोजन समितीचे प्राचार्य श्रीरा.ना. वानखडे ,प्राचार्य सुधीरमहाजन,डॉ.रजिया सुलताना शेतकरी नेते श्री दिलीप भोयर,कै.मैनाबाई बुंदेले राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.उज्ज्वला सुरेश मेहरे,प्रा.डॉ.प्रवीण बनसोड (नेर ),स्वागताध्यक्ष श्री अरुण खेरडे,कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ.अजय खडसे,प्रोफेसर डॉ.संजय खडसे,प्रा.डॉ.रवि चापके यांनी अभिनंदन केले आहे.