जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात ने. हि. कन्या विद्यालय टीम चा सहभाग

247

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8फेब्रुवारी):-भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय चंद्रपूर व बहुजन हिताय फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संध्या स्मूर्ती विहार पदमापुर जि. चंद्रपूर येथे तीन दिवसिय जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात ने हि कन्या विद्यालय ब्रम्हपुरी च्या 12 विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.या मेळाव्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थिनींनी उत्सफुर्त सहभाग घेतला. विद्यार्थिनींना यात सहभागी होण्यासाठी गाईड कॅप्टन कु.हटवार मॅडम व कु. बन्सोड मॅडम यांनी सहकार्य केले. तसेच मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गाईड्स कॅप्टन सौ बनपुरकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.