नागठाणे येथील वडार समाजातील श्रीमती चव्हाण यांच्या मिरची कंडाप यंत्र नुकसानी बाबत जिल्हा परिषद सी. ई . ओ. यांनी दिला दिलासा

168

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8फेब्रुवारी):-ग्रामपंचायत नागठाणे तालुका सातारा येथील माजी सैनिक विधवा श्रीमती सुरेखा विलास चव्हाण यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले मिरची कंडाप यंत्र दुकान अतिक्रमण ठरवून पाडण्यात आले. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली तसेच उपोषण केले. अखेर सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन सी ओ श्रीमती शयानी नागराजन यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारून त्यांना दिलासा दिला.

याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर व सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या विकासाबाबत कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. विद्या बर्गे यांनी आज सायंकाळी सातारा जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ श्रीमती नागराजन यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन झालेल्या घटनेबाबत माहिती दिली. याबाबत त्यांनी तातडीने चौकशी करून बेमुदत उपोषण करणाऱ्या श्रीमती सुरेखा विलास चव्हाण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलासा दिलेले आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने आठ फेब्रुवारी रोजी गट विकास अधिकारी बुद्दे यांची कार्य यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करणे बाबत शशिकांत जाधव तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी पत्र दिले होते तसेच आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सर्व कागदपत्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( अ) गट श्रीमती सुरेखा विलास चव्हाण यांचे व वडार समाजाच्या वतीने निवेदन, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे पत्र, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ग्रामपंचायत नागठाणे, भाडे पावती तसेच करारनामा, वीज मीटर बिल, नागठाणे ग्रामपंचायत कार्यालय नमुना नंबर ११ सन २०२३-२४ सालाबद्दल किरकोळ मागणीचे रजिस्टर, आधी कागदपत्र माहितीसाठी सादर केलेली आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे छायांकित प्रतीही या निवेदनासोबत जोडण्यात आलेले आहेत.

या निवेदनावर श्रीकांत देवकर यांची सही असून निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पातळीवर देण्यात आलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या सी. ई. ओ. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच श्रीमती नागराजन यांच्याकडे लेखी निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व उपोषणकर्ते यांचे नातेवाईक सोमनाथ धोत्रे, तानाजी देवकर, संतोष देवकर, रमेश विटकर आदी मान्यवर उपस्थित होते