धरणगाव रा.से.यो. स्वयंसेवकांनी पथनाट्यातून केली जनजागृती

86

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.9फेब्रुवारी):-कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव अनोरे येथे चालू आहे. सहाव्या दिवशी पथनाट्यातून विविध जनजागृती पर विषय उपस्थित गावकऱ्यांसमोर सादर केले. यामध्ये प्रामुख्याने हुंडाबळी, स्त्री शिक्षण, दारू बंदी, गाडी चालवताना मोबाईल चा वापर टाळा,अंधश्रद्धा निर्मूलन,मतदान जनजागृती , स्त्री सशक्तिकरण.

सकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. स्वप्नील खरे यांनी अनोरे गावातील शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे परीक्षण करून मातीचे आरोग्य कशा पद्धतीने तपासले जाते याची माहिती उपस्थित स्वयंसेवक व गावकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखविले.दुपारच्या प्रथम सत्रामध्ये धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय श्री उद्धव डमाले साहेब यांनी सामाजिक सुरक्षा या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी मोबाईलवर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यामार्फत होणाऱ्या फसवणुकीची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्र जळगावचे श्री विवेक सैंदाणे यांनी नोकरीपेक्षा उद्योग कसा श्रेष्ठ आहे याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्र तर्फे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या राबविल्या जातात याची माहिती उपस्थित स्वयंसेवकांना दिली.